Mumbai Air Quality index: मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती गेल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे हवा प्रदूषणात वाढ झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोकं वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान १३.८ अंशांवर गेल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती  गेल्याची बघायलामिळाली. दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचं सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळालं. 


मुंबईची हवा बिघडतेय!


मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 322  वर होता. तर दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 221 वर बघायला मिळालं. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा अधिक खराब झाल्याचं आकडेवारीवरुन दिसतेय. पुढील काही दिवसात मुंबईच्या हवेची पातळी सुधारली नाही, तर आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते. 


मुंबई शहरातील (Mumbai News) हवेच्या गुणवत्तेवरुन काही दिवसांपूर्वी खूप चर्चा झाली होती. मुंबई शहरातील (Mumbai City Air) हवेचा दर्जा अतिशय वाईट झाल्याची माहिती समोर आली होती. या मुद्द्याची चर्चा विधिमंडळापर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा सुधारला पाहिजे आणि मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईत 14 ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. 




भांडूपमधील एक्यूआय ३०७, मालाडमधील ३४२ वर तर कुलाब्यात ३५१ वर सर्वाधिक माझगावात एक्यूआय ३६१ वर अंधेरीतही हवा गुणवत्ता निर्देशांक ३४५ वर तर वरळीत २५९ वर दिसलं. दिल्लीतील मथुरा रोड केंद्र सोडता इतर हवा गुणवत्ता केंद्रांवर एक्यूआय २०० च्या जवळपास दिसला. एकीकडे टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीची वर्दळ कमी होती. मात्र, मुंबईतील तापमानात मोठी घटझाल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा ३०० पार गेलाय. सोबतच पुढील २ दिवस तापमानात अशी घट बघायला मिळणार असल्यानंमुंबईतील प्रदूषणात वाढ होईल. मुंबई जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पारच दिसला होता. अशात दिल्लीतील ७ ते ९जानेवारीपर्यंतचा एक्यूआय सरासरी ३५० पार बघायला मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची दिल्ली होते आहे का? असा प्रश्न निर्माणझालाय. वाढत्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांचा श्वास कोंडतोय सोबतच आरोग्याच्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागतेय. त्यामुळे यावरसरकारनं देखील तातडीनं पाऊलं उचलण्याची गरज आहे.