Mumbai Air Pollution : मुंबई (Mumbai) सह राज्यातील काही शहरातील हवेची गुणवत्ता (Air Quality) पातळी खावलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील काही शहरांमधील हवा गुणवत्ता पातळी (Air Quality Level) मध्यम (Moderate) ते वाईट (Bad) श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी समोर आली आहे.


मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली


मुंबई शहरातील एकूण एक्यूआय 139 वर तर, कुलाबा परिसरातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत, एक्यूआय 244 वर आहे. पुण्यातील एक्यूआय 183 वर ज्यात पीएम 2.5, पीएम 10 ची मात्रा अधिक आहे. परभणीतील एक्यूआय 265 वर, नाशिकमधील एक्यूआय 140 वर, नागपूरमधील 143 वर, लातूर 178 वर आहे. बदलापूरमध्ये एक्यूआय 271 वर, उल्हानगरातील एक्यूआय 263 वर, बेलापुरातील एक्यूआय 139 वर, भिवंडीतील हवा गुणवत्ता पातळी 229 वर तर कल्याण परिसरातील एक्यूआय 205 वर, ठाण्यातील एक्यूआय 159 वर, नवी मुंबईतील एक्यूआय 267 वर आहे. 


जळगावातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत, एक्यूआय 238 वर, चंद्रपुरातील एक्यूआय 202 वर तर धुळ्यातील एक्यूआय 162 वर आहे. अमरावतीमधील एक्यूआय 114 वर, अकोल्यातील हवा गुणवत्ता पातळी 205 वर, तर संभाजीनगरमधील हवा गुणवत्ता पातळी मध्यम श्रेणीत, एक्यूआय 121 वर आहे. 


दिल्लीला प्रदूषणाचा विळखा


दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा नवा रेकॉर्ड बनला आहे. प्रदूषणामुळे दिल्लीचे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही केल्या वाढत्या प्रदूषणापासून सुटका मिळताना दिसत नाही. सरकारही सर्व प्रकारचे प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता दिल्ली सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आदेश देण्यात आला आहे. सोमवारपासून सरकारी आणि खासगी कंपन्यांचे फक्त टक्के कर्मचारी त्यांच्या कार्यालयात येतील, असा आदेश सरकारने जारी केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज