Mumbai : दुकानातील 24 तोळे सोने चोरून पसार झाल्यानंतर मुंबई सोडण्याआधी आरोपीने मालकाला फोन करून दम दिला. आरोपी म्हणाला, मुंबई पोलीस असो नाहीतर अन्य कोणी, आमच्यापर्यंत पोहचू शकत नाही. असे चॅलेंज आरोपीने मालकाला दिले. ते चॅलेंज स्विकारत भोईवाडा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


दादरच्या नायगावमध्ये राहणारा अक्रम अली शेख याचे सोन्याचे दागिने बनवायचा व्यवसाय आहे. त्याला कारागिरांची आवश्यकता असल्याने त्याने त्याचा ओळखीच्या असितकुमार सिंग 33 याला संपर्क साधून तसे सांगितले. असितने बंगालमधील दोघांना कामासाठी पाठवतो असे अक्रमला सांगितले. त्यानंतर असित तसेच अन्य दोघेजण मुंबईत आले. ते चुनाभट्टी येथे भेटले आणि अक्रमकडील सोने चोरायचा  कट रचला.मास्टरमार्इंड असलेल्या असितने कशाप्रकारे चोरी करायचे ते दोघांना सांगितले. त्यानुसार प्रदीत अस्तोमन्ना आणि एस. के. मन्सुर अब्दुल अली असे दोघे जण अक्रमकडे कामासाठी गेले. दोन दिवस त्यांनी इमाने इतबारे काम केले. मात्र तिसऱ्या दिवशी जवळपास 20 लाख किमतीचे 24 तोळे सोने घेऊन पळ काढला. याप्रकरणी अक्रमने तक्रार दिल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अबंग तसेच मदने, मोपारी, तडवी, ननावरे या पथकाने कसून तपास करीत असितकुमार, अनुप प्रामाणिक आणि मोबिन शहा अशा तिघांना बंगालमध्ये जाऊन पकडले. त्यांच्याकडून 19 तोळे सोने हस्तगत केले.


पोलिसांना चकवायला वाया वाया गेले
सोने घेऊन पळाल्यानंतर प्रदीपने काही वेळेनंतर अक्रमला फोन केला. आम्ही सोने चोरले आहे, दम असेल तर पकडून दाखवा, मुंबई पोलीस असो नाहीतर अन्य कोणी... आमच्यापर्यंत कोणी पोहचू शकत नाही, असे चॅलेंज त्याने दिले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघेही आधी चुन्नाभट्टीला गेले. तेथून ते शीवला आले. शीववरून बसने नागपूरला गेले. नागपूरला बस बदलली आणि रायपूरला गेले. रायपूरवरून ट्रेनने त्यांनी बंगाल गाठले. या प्रवासात तिघांनीही मोबाईल बंद ठेवले. इवढे करूनही अंबग व त्यांच्या पथकाने तिघांनाही पकडले.


अक्रम याच्याकडे कामासाठी गेले तेव्हा अनुपने त्याचे नाव प्रदीप तर मोबिनने त्याचे नाव एस.के. सांगितले होते. त्या नावांनी असलेले आधारकार्ड देखील त्यांनी दाखवले. मात्र अटक केल्यानंतर त्यांचे खर नाव समोर आले. खोटे आधारकार्ड बनवून ते दाखवल्याचे आरोपींनी कबूल केले. तसेच तिघांनी वर्षभरात अनेक सीम कार्ड बदलल्याचे समोर आले आहे. 


संबंधित बातम्या


Merry Christmas 2021 : वसईत नाताळचा उत्साह, बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी नागरिक बाजारात


ST Strike : कामगार संघटनेकडून संपातून माघारीबाबत अधिकृत माहिती नाही, एसटी महामंडळाची मुंबई उच्च न्यायालयात कबूली


सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha