Mumbai AC Local And First Class Ticket Fare : मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवाशांचा आजपासून एसी लोकलचा प्रवास स्वस्त झाला आहे. रेल्वेने एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजपासून लागू झाला आहे. आता 5 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी एसी लोकलचे तिकिट 30 रुपये असणार आहे. याआधी हा तिकीट दर 65 रुपये होता. त्याशिवाय प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) वर्गाच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. 


मुंबईतील एसी लोकलचे तिकीट दर हे जास्त असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात घट करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. ऐन गर्दीच्या वेळीदेखील एसी लोकल रिकाम्या धावत असे. त्यामुळे एसी लोकलमध्ये प्रवासी भार वाढवण्यासाठी तिकीट दरात कपात करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या  तिकीट दरात 50 टक्क्यांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गारेगार लोकलमधून प्रवास करता येणार आहे.


फर्स्ट क्लासचा प्रवासही स्वस्त


लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये करण्यात आलेली कपात आजपासून लागू झाली आहे. सध्या फर्स्ट क्लासचं ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपये असून मासिक पासची किंमत 755 रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर 140 रुपयांचं तिकीट आता 85 रुपयांपर्यत म्हणजे सुमारे 50 टक्के कमी होणार आहे.


मासिक पासच्या दरात बदल नाही 


एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर जैसे थे राहणार आहेत. 


नवीन तिकीट दर असे असणार 


>> मध्य रेल्वेवर तिकीट दर किती?


चर्चगेट पासून प्रवास दर (जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर)


मुंबई सेंट्रल - एसी - 65 चे 35 फर्स्ट क्लास - 50 चे 25


दादर - एसी - 90 चे 50 फर्स्ट क्लास - 70 चे 40


वांद्रे - एसी - 90 चे 50 फर्स्ट क्लास - 70 चे 40


अंधेरी -एसी - 135 चे 70 फर्स्ट क्लास - 105 चे 60


बोरिवली - एसी - 180 चे 95 फर्स्ट क्लास - 140 चे 85


भाईंदर - एसी - 190 चे 100 फर्स्ट क्लास - 150 चे 90


वसई रोड -एसी - 210 चे 105 फर्स्ट क्लास - 165 चे 100


नालासोपारा - एसी - 220 चे 115 फर्स्ट क्लास - 170 चे 100


विरार - एसी - 220 चे 115, फर्स्ट क्लास - 170 चे 100



>> मध्य रेल्वेवर तिकीट दर किती?


सीएसएमटी पासून (जुने दर - नवे दर)


भायखळा - एसी - 65 चे 35,  फर्स्ट क्लास - 50 चे 25


दादर - एसी - 65 चे 35,  फर्स्ट क्लास - 50 चे 25


कुर्ला - एसी - 135 चे 70,  फर्स्ट क्लास - 105 चे 60
 
घाटकोपर - एसी - 135 चे 70, फर्स्ट क्लास - 105 चे 60


मुलुंड - एसी - 180 चे 95, फर्स्ट क्लास - 140 चे 85


ठाणे - एसी - 180 चे 95, फर्स्ट क्लास - 140 चे 85


दिवा - एसी - 190 चे 100, फर्स्ट क्लास - 150 चे 90


डोंबिवली - एसी - 205 चे 105, फर्स्ट क्लास - 160 चे 95


कल्याण - एसी - 210 चे 105, फर्स्ट क्लास - 165 चे 100