Loudspeaker News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजान झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे पालन आज कुर्ला परिसरात झाल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता मुंबई मधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टी नी एकत्र येत पहाटे ची अजाण स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुंबईच्या मशीद बंदर, भायखळा, मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा इत्यादी परिसरात असलेल्या 26 मशिदीच्या ट्रस्टी, मौलवी आणि संबंधित लोकांनी एकत्र येत एक बैठक घेतली. यामध्ये पहाटे 6 वाजण्याच्या आधी होणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाउडस्पीकरचा वापर न करता करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही कोणाच्याही दबावाखाली नाही तर न्यायालयाचा आदेश आणि मुंबईत शांतता राहावी म्हणून हा समजूतदारपणे निर्णय घेतला असल्याचे इथे उपस्थित असलेल्या मशिदी संबंधीत ट्रस्टी आणि मौलवी यांनी सांगितले.


भिवंडीत भोंगा आंदोलन करण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते ताब्यात 


मस्जिदीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावून मनसेकडून उत्तर देण्याची तयारी केली होती. पहाटेपासून मनसेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत असताना भिवंडी पडघा येथे पहाटे 5 ची अजान भोंग्यावर न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली नाही. परंतू तत्पूर्वीच परिसरात चोख असा बंदोबस्त पोलिसांनी लावला होता. तर भिवंडीत नवीबस्ती मार्कंडेय मंदीर या ठिकाणी सुध्दा काही कार्यकर्ते येऊ शकतात, यासाठी पोलीस रस्त्यावर तैनात होते. तर जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, शहराध्यक्ष मनोज गुळवी यास 10 ते 12 कार्यकर्त्यांसह पहाटे 4.45 वाजता विविध पोलिस ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: