Mumbai Latest Update : कुर्ला येथे असलेल्या आंबेडकर नगर, गरीब मोहल्लामध्ये दरड आणि घर घरावर कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. लता साळुंखे असे मयत महिलेचे नाव आहे.आज सकाळी अचानक ही दरड खाली असलेल्या साळुंखे कुटुंबाचा घरावर कोसळली. जिथे दरड कोसळली तिथे साळुंखे कुटुंबाचे किचन होते. 


माहितीनुसार घर कोसळलं त्यावेळी लता साळुंखे या स्वयंपाक करीत होत्या. त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर ही दरड कोसळली. घटनेनंतर त्यांना तात्काळ गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कुर्ला नर्सिंग होममध्ये उपचारास दाखल केले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी सांंगितलं की, हा विभाग विकासकाने विकासासाठी घेतला आहे. मात्र अजून ही इथला विकास झाला नसल्याने अशा घटना वारंवार होत असल्याचे स्थानिक सांगत आहे.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha