मुंबई : शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून 15 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सोमवारी सकाळी मेघना अगवणे शिकवणीवरुन परत येत होती. त्यावेळी नुकतंच साफ केलेल्या रस्त्यावरुन जाण्यास तिला शेजाऱ्यांनी मनाई केली. त्यावरुन झालेल्या भांडणात मेघनाच्या पायावर बाटली मारण्यात आली, यात तिला जखमा झाल्या.
या घटनेनंतर अगवणे कुटुंबानं पोलिस तक्रार करुनही काहीच कारवाई करण्यात आली नाही. संध्याकाळी पुन्हा झालेल्या बाचाबाचीनंतर 10 ते 12 जणांनी मेघना आणि तिची बहीण पूजाला घरात घुसून बेदम मारहाण केली.
हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मेघनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे.