मुंबई:  भाजपने काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला खाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित येण्याच्या मनस्थितीत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

भाजपविरोधात येत्या अधिवेशनात विरोधक अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्याबाबत जयंत पाटलांना विचारलं.

पाटील म्हणाले, "विरोधकांनी अविश्वस ठराव सादर केल्यानंतर 14 दिवसांची मुदत दिली जाते, पण शिवसेनेची भूमिका काय आहे? आमची भीती दाखवून शिवसेना भाजपबरोबर बसणार असेल तर आम्ही असं काम करणार नाही. शिवसेनेनं स्पष्ट भूमिका घेतली तर याला अर्थ आहे. जर शिवसेना संदिग्ध भूमिका घेत असेल आणि केवळ भाजपला राष्ट्रवादी, काँग्रेसची भीती दाखवत असेल तर ती शिवसेनेची आत्महत्या असेल"

शिवसेना भाजपसोबत गेली तर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं असणार नाही. बाळासाहेब असते तर सध्याचं चित्र वेगळं असतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसारखी भूमिका घेणे ही सर्व शिवसैनिकांची अपेक्षा आहे. शिवसैनिकांवर विश्वस असेल तर भाजपशी फारकत घेण्याची वेळ आली आहे, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

शिवसेनेनं भाजपसोबत जाण्यात आता काही राम राहिला नाही. शिवसेनेचं संख्याबळ आहे.

काँग्रेस शिवसेनेसोबत जात असेल तर दगडापेक्षा वीट मऊ अशी भूमिका घेतली तर वाईट काय?  असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

शिवसेनेनं धमक दाखण्याची गरज आहे. आज ताठपणा आणि बाणेदारपणा दाखवला नाही, तर पुढच्या काळात शिवसेना दिसेल असं मला वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीची भूमिका पवार घेतील

राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ नाही. आम्ही समविचारी पक्षाची भूमिका सोडली नाही, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात पूर्वीपासून आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमची भूमिका भाजपविरोधीच असल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावेळी निवडणूक झाल्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे, असं पाटील म्हणाले.

मी राजकारणात एवढी वर्ष आहे, पण एवढा पैसे खर्च करणारा पक्ष मी पाहिलेलं नाही, असं म्हणत पाटील यांनी भाजपच्या निवडणूक जाहिरातींवर टीकास्त्र सोडलं.

संबंधित बातम्या

दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी

महापौरपदासाठी गट स्थापन, शिवसेनेची सावध पावलं

 BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल

मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात

शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ

मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा?

शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ

दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब

शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…

राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

महापौरपदासाठी आक्रमक राहा, भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा मुंबईत फोन

सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी

‘सामना’तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी

मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे