मुंबई : गर्भपातासाठी गेलेल्या मुंबईतील 13 वर्षीय बलात्कार पीडितीने बाळाला जन्म दिला. सर्वोच्च न्यायालयाकडून तीनच दिवसांपूर्वी 31 आठवड्यांच्या गर्भवती बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली होती. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर 8 सप्टेंबरला तिचं ऑपरेशन झालं.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती, परंतु आता त्यांनी बाळाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
जेजे रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे कार्यकारी डीन आणि प्रोफ्रेसर विनायक काळे यांनी सांगितलं की, "आज (8 सप्टेंबर) दुपारनंतर ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी मुलीने मुलाला जन्म दिला. नवजात बाळाचं वजन 1.8 किलो असून त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे."
13 वर्षीय बलात्कार पीडितेला सुप्रीम कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी
बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका आहे असा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 6 सप्टेंबरला बलात्कार पीडित मुलीला 31व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी दिली होती. परंतु गर्भपात न होता प्रसुती झाली.
"आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, परंतु भ्रूणाची पूर्णत: वाढ झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे तिची प्रसुती हा एकमेव मार्ग होता. आई आणि बाळ सुखरुप आहे," असं डॉ. विनायक काळे यांनी सांगितलं.
"शस्त्रक्रियेनंतर मुलगी पूर्णत: बरी आहे आणि आम्ही खूश आहोत," असं पीडित मुलीची आई म्हणाली.
कोर्टाने गर्भपाताची परवानगी दिली, पण बलात्कार पीडितेची प्रसुती झाली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2017 11:10 AM (IST)
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती, परंतु आता त्यांनी बाळाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -