मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश याचं लग्न हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका हिच्याशी ठरलं आहे. याच निमित्तानं अंबांनीच्या मुंबईतील घरी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं.


'अँटिलिया'तील या पार्टीला शाहरुख खान, करण जोहर, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, किरण राव, हरभजन सिंह यांच्यासह बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

आकाश अंबानी आणि श्लोका या दोघांचं प्री-एंगेजमेंट शूट नुकतंच गोव्यात पार पडलं. त्यांनंतर त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदीरात जाऊन बाप्पाचे आशीर्वादही घेतले.

मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा




लग्नाचे विविध कार्यक्रम तीन ते चार दिवस मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये चालण्याची शक्यता आहे. श्लोका मेहता देशातील प्रसिद्ध हीरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी कन्या आहे.

कोण आहे श्लोका मेहता?

श्लोका ही रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोकाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं शिक्षण घेतलं.

त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोका आपल्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक बनली. याशिवाय ती ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक आहे जी एनजीओंना मदत करते.

आकाशचंही यूएसमध्ये शिक्षण

मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशनेही शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली होती. तिथल्या प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.

आकाश अंबानी रिलायन्स जिओ टेलिकॉमचे चीफ ऑफ स्ट्रॅटेजी अर्थात धोरण प्रमुख आहेत. या कंपनीची संपत्ती सुमारे 2 लाख कोटी इतकी आहे.

संबंधित बातम्या

अंबानींच्या मुलाच्या लग्नाची चर्चा, कोण आहे होणारी सून?