मुंबई: सलग सुट्ट्यांमुळे या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहतील, असे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.  मात्र बँकांना सलग चार सुट्ट्या नाहीत. बँकांना  गुरुवारी 29 मार्चला महावीर जयंतीची, त्यानंतर 30 मार्चला गुड फ्रायडेची अशा सलग दोन सुट्ट्या आहेत. मात्र 31 मार्चला पाचवा शनिवार असल्याने बँका सुरु राहणार आहेत. पण  31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने, बँकांमध्ये कर भरणाऱ्यांची गर्दी जास्त असेल. शिवाय बँकांचीही ताळेबंदाची घाई असते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी शनिवारी तितकासा वेळ मिळू शकणार नाही.  त्यानंतर 1 एप्रिलला रविवार असल्याने बँकांना पुन्हा सुट्टी असेल. बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे बँका सलग चार दिवसं बंद असणार या सोशल मीडियावरील बातमीवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन करण्यात येतंय. या आठवड्यात बँकांना कधी कधी सुट्टी?
  • गुरुवार 29 मार्च – महावीर जयंती
  • शुक्रवार 30 मार्च – गुड फ्रायडे
  • शनिवार 31 मार्च – बँक सुरु राहणार
  • रविवार 1 एप्रिल – साप्ताहिक सुट्टी