Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येमध्ये श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचली असून देशभर उत्साहाची लाट पसरली आहे. जय श्रीरामाच्या या उत्साहाच्या लाटेतून आता जगभरात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घरही सुटलं नाही. मुकेश अंबानी यांचे मुंबईतील 'अँटिलिया' हे निवासस्थान (Mukesh Ambani Antilia House) सजवण्यात आलं आहे. जय श्री राम असं लिहित मुकेश अंबानी यांचे घर सजवण्यात आलं आहे.
अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीय उद्योग जगतातील ज्या लोकांना आमंत्रण मिळाले आहे, त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा समावेश आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच्या अँटिलिया या निवासस्थानाला विशेष सजावट करण्यात आली आहे, तसेच इमारतीवर लेझरच्या लाईटनेही रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या गुच्छ आणि रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवण्यात आले आहे. प्रभू रामाच्या स्वागतासाठी अँटिलिया बिल्डिंगचे इतर भागही सजवण्यात आले आहेत. घराच्या आत आणि बाहेर हिंदू धर्माची चिन्हे आणि प्रभू रामाशी संबंधित चित्रे लावण्यात आली आहेत. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचे अंबानी कुटुंबीयांनी म्हटले आहे.
अयोध्यानगरी सजली
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा तो क्षण अवघ्या काही क्षणांमध्ये पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सज्ज झाली, मंदिरामध्ये गेले अनेक दिवस वेदपठण, जपानुष्ठान सुरु आहे. अवघं वातावरण चैतन्यमय झालं आहे. घनपाठ, होमहवन, देवअधिवास, चार वेदांचं पठण, पुण्याहवाचन असे सात्विक आणि धार्मिक कार्यक्रम मंत्रोच्चारात, रामनामात मंगलमयरित्या संपन्न होत आहेत.
मंदिर सजून गेलं आहे, शिखर असेल, घुमट असेल, प्रत्येक खांब असेल सगळीकडे फुलापानांची आरास दिसते आहे, रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत तर दुसरीकडे पूजेसाठी बसणारे यजमान असोत की पूजा सांगणे पुरोहित सारेजण रामकार्यात गुंग होऊन गेले आहेत. साऱ्यांना आता आस एकच लागली आहे ती म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची.
ही बातमी वाचा: