मुंबई : आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात. 'जगप्रसिध्द चोरी' दाखवण्यात आलेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग काल दुपारी नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज करण्यात आला. शुक्रवारी मनी हाईस्टचा पाचवा भाग रिलीज होताचा चाहते तुटून पडले. भारतात देखील याची क्रेझ पाहायला मिळाली आहे. आता सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो वेगाने व्हायल होत असून लोकांनी त्याचे कौतुक केले आहे.


Money Heist 5 : 'जगप्रसिध्द चोरी' पाहण्यासाठी जयपूरच्या कंपनीने दिली आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी 


 मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग रिलीज झाल्याच्या दिवशी मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओमध्ये  मनी हाईस्टच्या बेला चाओ  (Bella Ciao) या सुप्रसिद्ध गाण्यावर  इंस्ट्रूमेंट वर्जन सादर केला आहे. मुंबई पोलिसांच्या या परफॉर्मन्सचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केले आहे. मुंबई पोलिसांच्या या बँडला खाकी स्टुडिओ या नावाने ओळखले जाते.



बेला चाओ  (Bella Ciao) एक इटालियन फॉर्मर प्रोटेस्ट गाणे आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गाण्याचा सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देखील लिहिले आहे, " आम्ही कायमच ट्रेंड्स फॉलो करण्याचा प्रयत्न करतो". नेटफ्लिक्स इंडियाने देखील मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे.






मनी हाईस्ट एक क्राईम थ्रिलर वेबसीरीज आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. सीझनमध्ये 5 मध्ये एकूण दहा एपिसोड्स असणार आहेत. पण, हे एपिसोड दोन भागांत रिलीज केले जाणार आहेत. पहिला भाग 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहवी लागणार आहे. दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.   प्रश्न शेवटी पैशाचा आहे, त्यामुळे या जगप्रसिद्ध चोरीमध्ये प्रोफेसर पुढे काय शक्कल लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता ही उत्सुकता संपली असून मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग  नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे.


Money Heist 5 : चाहत्यांची प्रतिक्षा संपली, 'जगप्रसिध्द चोरी' असलेल्या 'मनी हाईस्ट'चा पाचवा सीझन रिलीज