Money Heist 5 : चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून 'जगप्रसिध्द चोरी' दाखवण्यात आलेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग आज दुपारी रिलीज करण्यात आला. हा सीझन नेटफ्लिक्स (Netflix) वर दुपारी 12.30 वाजता रिलीज करण्यात आला. गेल्या 4 सीझनप्रमाणेच पाचवा सीझनही हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज करण्यात आला आहे. प्रश्न शेवटी पैशाचा आहे, त्यामुळे या जगप्रसिद्ध चोरीमध्ये प्रोफेसर पुढे काय शक्कल लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.


दोन भागांत रिलीज होणार सीरिज 


मनी हाईस्ट एक क्राईम थ्रिलर वेबसीरीज आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. सीझनमध्ये 5 मध्ये एकूण दहा एपिसोड्स असणार आहेत. पण, हे एपिसोड दोन भागांत रिलीज केले जाणार आहेत. पहिला भाग 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहवी लागणार आहे. दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. 





'जगप्रसिध्द चोरी' पाहण्यासाठी जयपूरच्या कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी 


 प्रश्न शेवटी पैशाचा आहे, त्यामुळे या जगप्रसिद्ध चोरीमध्ये प्रोफेसर पुढे काय शक्कल लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता ही उत्सुकता संपली असून मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग  नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे. ही भन्नाट चोरी पाहण्यासाठी जयपूरच्या एका आयटी कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली असून त्या दिवशी ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरमधील आयटी कंपनी असलेली व्हर्व लॉजिकने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 सप्टेंबरला एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. Netflix and Chill या नावाने कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवला असून त्यामध्ये मनी हाईस्टच्या पाचव्या सीनजचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने पाठवलेल्या या मेलचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर या कंपनीमध्ये जॉबसाठी अॅप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल असा गंमतशीर प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे.