मुंबई : प्रश्न शेवटी पैशाचा आहे, त्यामुळे या जगप्रसिद्ध चोरीमध्ये प्रोफेसर पुढे काय शक्कल लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता ही उत्सुकता संपली असून मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग 3 सप्टेंबरला म्हणजे आज मध्यरात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. ही भन्नाट चोरी पाहण्यासाठी जयपूरच्या एका आयटी कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली असून त्या दिवशी ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


जयपूरमधील आयटी कंपनी असलेली व्हर्व लॉजिकने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 सप्टेंबरला एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. Netflix and Chill या नावाने कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवला असून त्यामध्ये मनी हाईस्टच्या पाचव्या सीनजचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने पाठवलेल्या या मेलचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर या कंपनीमध्ये जॉबसाठी अॅप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल असा गंमतशीर प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे. 


 






ई मेलमध्ये काय लिहिलंय? 
Netflix and Chill या नावाने पाठवलेल्या या कंपनीच्या ई मेलमध्ये म्हटलंय की, "सुट्टीसाठी करण्यात येणारे खोट्या मेल, अनेक कर्मचारी एकाच वेळी सुट्टीवर जाणे, कामावर न येता फोन स्वीच ऑफ करणे या गोष्टीपासून वाचण्यासाठी आम्ही आपल्याला सुट्टी देत नाही आहोत. कधी कधी 'चिल मारणे' हे देखील आपल्या कामाची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी आहे याची जाणीव कंपनीला आहे."  


मनी हाईस्ट ही सीरिज मूळ स्पॅनिश मध्ये आहे. त्यामधील प्रोफेसरची भूमिका अल्वारो मॉर्टे यांनी साकारली आहे. या मालिकेतील सर्वांच्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून त्याचे जगभरात कौतुक केलं जात आहे. मनी हाईस्टचा चौथा सिजन एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून यामध्ये एकीकडे प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमध्ये फसली आहे तर दुसरीकडे इन्फेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरचा पत्ता शोधून काढून त्याच्यावर बंदुक रोखली आहे. आता अशा स्थितीत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे. पाचव्या सीजनचा टीजर रिलिज झाला असून प्रोफेसरची इतर साथीदार आता वॉर साठी तयार होत आहे. 


संबंधित बातम्या :