पनवेल : मुंबईच्या विक्रोळीमध्ये काल (रविवार) मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विट यामुळं मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) पनवेलमधील कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांना हुसकावून लावलं.
यावेळी आक्रमक मनसैनिकांनी अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल, भाजीचे गाडेही उधळून लावले. तसंच मोठ्या प्रमाणात स्टॉलची तोडफोडही केली. या सर्व प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
फेरीवाल्याच्या मारहाणीनंतर मनसेची ‘कृष्णकुंज’वर तातडीची बैठक
मुंबईतील विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर आणि संजय निरुपम यांच्या चिथावणीखोर ट्विटमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्याच संतापाची झळ आज (सोमवार) पनवेलच्या कामोठे येथील फेरीवाल्यांना सोसावी लागली.
दरम्यान, आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. शुक्रवारपासून मुंबईत पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सना राज ठाकरेंच्या नावानिशी पत्र पाठवण्यात येणार आहे.
विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मानसरोवर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांच्या सामानाची नासधूस केली. मनसेचे पदाधिकारी महेश जाधव, सुधीर नवले, केसरीनाथ पाटील, अविनाश पडवळ यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांनी फूटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यांना मारहाण करत हुसकावून लावलं.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे फेरीवाले आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.
आंदोलनानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे.
मनसेच्या आंदोनलानंतर परिसरातील तणाव निवळला असला तरी फेरीवाल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
फेरीवाले, मराठी पाट्या आणि बँकांमध्ये मराठी व्यवहारासाठी ही पत्रं वाटण्यात येतील. जर संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा निर्णय कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, काल रात्री विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी काँग्रेसच्या अब्दुल अन्सारी आणि रिझवान नावाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम
अमित ठाकरे मध्यरात्री 2 वाजता विश्वजित ढोलमांच्या भेटीला