मुंबई: लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.
हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी 'मॅट'मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला.
बीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी.
ललिता 23 जूनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन आणि शारीरिक चाचणी करता भरती झाली. 2-3 तास चाचणी झाल्यानंतर जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिला पोलिसाला लिंग बदलण्यास हिरवा कंदील दाखवला.
त्यानंतर 17 सप्टेंबर 2017 ला या महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक बीड यांना पत्र लिहून लिंग बदलाकरता सुट्टी पाहिजे असा अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली.
पण, या महिला पोलीसाची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे, त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल असं पोलीस अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नंतर आपला नोकरीवरील हक्क मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय या महिलेकडे पर्याय उरला नाही.
संबंधित बातम्या
लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात
‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री
बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी
'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
27 Nov 2017 01:39 PM (IST)
हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी 'मॅट'मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -