तिकीट मिळालं असतं तर मीच जिंकलो असतो : राणे
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2017 05:32 PM (IST)
भाजपचा निर्णय मान्य असल्याची कबुली नारायण राणे यांनी दिली आहे
मुंबई : शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने नारायण राणेंचा पत्ता कट केला आणि प्रसाद लाड यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. माझ्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येणं हाच विजय असल्याचं नारायण राणे म्हणाले. भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची मतं फुटली असती. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही विधानपरिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला. भाजपचा निर्णय मान्य असल्याचंही राणे म्हणाले. दुसरीकडे, भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधूनच नाराजीचे सूर उमटत आहेत.