मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने 25 जानेवारी रोजी 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण मनसेने ठाकरे चित्रपट, बाळसाहेबांची जयंती असं निमित्त साधून शिवसेनेला टोला लगावला आहे. 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,' असा मजकूर असलेलं पोस्टर मनसेतर्फे लावण्यात आलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. परंतु सिनेमाचे निर्माते संजय राऊत दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना म्हणावं तसं श्रेय देत नससल्याचं मनसेला वाटत आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा उल्लेख न करता चित्रपटाला शुभेच्छा देणारं पोस्टर मनसेतर्फे दादरमध्ये लावण्यात आलं आहे. ज्यावर 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला मनसे शुभेच्छा, असं लिहिलं आहे.



पण 'ठाकरे'च्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे अशी अनोखी युती पाहायला मिळत आहे, हे मात्र खरं .

नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Continues below advertisement


बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर

ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शित

सत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!


'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!


'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप


'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे


बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती