मोबाईलची बॅटरी लगेच उतरते? ही पॉवरफूल बॅटरी तुमची समस्या सोडवेल!
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2019 12:14 AM (IST)
तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरते? बॅटरी पटकन चार्ज होत नाही? तुमची ही समस्या आता लवकरच दूर होणार आहे.
मुंबई : तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरते? बॅटरी पटकन चार्ज होत नाही? तुमची ही समस्या आता लवकरच दूर होणार आहे. मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक प्रवीण वाळके यांनी संशोधन केलं आणि पॉवरफूल बॅटरीचा शोध लावला. ही बॅटरी जरी आकाराने लहान असली तरी काही मिनिटांमध्ये चार्ज होते आणि जास्त काळ चार्ज राहते. शिवाय, या बॅटरीची कार्यक्षमतासुद्धा इतर बॅटरीच्या तुलनेत जास्त आहे, असा दावा करण्यात आला आहे. या बॅटरीसाठी कार्बन मटेरियलचे नॅनो पार्टीकल आणि मॅग्नेशियम ऑक्सासाईडचा वापर करून लेयर्स तयार केले आहेत. दोन वर्ष संशोधनानंतर या बॅटरीच्या पेटंटसाठी प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात मोबाईल, इलेक्ट्रिक वाहने यामध्ये या बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ही पॉवरफूल बॅटरी अनेकांसाठी उपयुक्त ठरणारी असेल.