मुंबई : शैक्षणिक शुल्कात वाढ करणाऱ्या मुंबईतील चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेज यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून इशारावजा पत्र देण्यात आले आहे. आर्थिक फायद्यासाठी जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे. असा सूचक इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी हा इशारा दिला आहे.


अखिल चित्रे यांनी त्यांच्याकडे मिठीबाई कॉलेज आणि चेतना कॉलेज यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आणि विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला अशा तक्रारी आल्याच्या म्हंटल आहे. त्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी शनिवारी चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेजच्या प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांनी यावर्षी शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये. यासोबतचं सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कुटुंब चालवण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पैशासाठी तगादा लावू नये. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे भरण्यासाठी हफ्त्यांची सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली होती. अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या तर शाळा महाविद्यालये देखील अडचणीत येणार नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांवर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ताण येणार नाही. याबाबत बोलताना अखिल चित्रे म्हणाले की, राज्यासह संपूर्ण जगाला सध्या कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर आजाराने ग्रासले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे जीव देखील गेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही परिस्थिती आणखी किती महिने राहिल याबाबत सध्या अंदाज वर्तवने देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. यासोबतचं अनेक अशी कुटुंब आहेत की घरात कमावणारी एक व्यक्ती आहे. कुटुंबात त्यांच्यावर अवलंबून राहणारे अनेकजण आहेत.



पेंग्वीन गँगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप


अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे की घराचे तीन तीन महिन्यांपासून थकलेले घरभाडे भरावे की कुटुंबाला जगवावे. असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्क घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे तगादा लावू नये असं परिपत्रक काढलं आहे. परंतु, तरीदेखील मुंबईतील मिठीबाई आणि चेतना कॉलेजने मात्र विद्यार्थ्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज केले आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. महाविद्यालयांनी सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मासिक हफ्त्यांची सोय उपलब्ध करुन द्यावी. जर महाविद्यालयांनी आम्ही इशारा देऊन देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ केली आणि विद्यार्थ्यांच्या मागे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला तर मात्र महाराष्ट्र विद्यार्थी सेना गप्प बसणार नाही. या विरोधात मोठं पाऊल उचललं जाईल. यामुळे होणाऱ्या नुकसानाला महाविद्यालय प्रशासन जबाबदार असेल.


मनविसेच्या पत्रानंतर मिठीबाई महाविद्यालयाकडून शैक्षणिक शुल्कातील वाढ रद्द
मनविसेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रानंतर मिठीबाई महाविद्यालयातील बँच़लर ऑफ मास मीडिया अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात करण्यात आलेली वाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रासाठी 35 हजार रुपये इतके शुल्क होते. मात्र, यात 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. तशा आशयाचे मेसेज देखील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. अखेर मनविसेच्या पत्रानंतर शुल्कवाढ रद्द करण्यात आली आहे.


MNS on Deadbody bags | शवपिशव्या घोटाळा, काय खरं काय खोटं? मनसेकडून विश्लेषण