मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या काळात कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी उपाययोजना करण्याच्याऐवजी मुंबई महानगर पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवाय याला जबाबदार पेंग्विन गँग असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. आज मनसेच्या वतीने मुंबई महानगर पालिकेत कशापद्दतीने भ्रष्टाचार करण्यात येतोय. यासोबतच कशापद्दतीने मराठी उद्योजकांना डावलण्यात येतं आहे. हे उघडकिस आणण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली.



सध्या महापालिकेने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ज्या मोठ्या बॅगेत भरला जातो. त्या शवपिशव्यांच्या खरेदीत देखील घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. महापालिकेकडून 10 तारखेला मृतदेहांना ठेवण्यासाठीच्या शवपिशव्या (बॉडीबॅग्ज) खरेदी करण्यासाठीचे टेंडर काढण्यात आले होते. यासाठी औरंगाबादच्या वेदांत कंपनीचे मालक कल्याणकर यांनी महापालिकेशी संपर्क साधला होता. त्यानंतर महापालिकेकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्यांनी 5500 हजार रुपये किंमतीची बॅग घेण्यास महापालिका उत्सुक असल्याचं कळवण्यात आलं. परंतु, त्याच दिवशी विवेकानंद गुप्ता या माणसांकडून संपर्क साधण्यात आला आणि या कंत्राटासाठी रक्कम मागण्यात आली.


Covid-19 | दिलासादायक! मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 'चाळीशी' पार
रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे जी बॅग महापालिका खरेदी करणार होती. ती कशापद्दतीने महाग आहे आणि कशापद्दतीने भ्रष्टाचार सुरू आहे, याचा अपप्रचार करण्यात आला. अखेर ते कंत्राट रद्द करण्यात आलं असून अतिशय हलक्या प्रतीच्या शवपिशव्या बनवून देणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे, असं आरोप शवपिशव्या बनवणाऱ्या कंपनी ते मालक सतीश मासवणकर यांनी केला आहे. गंभीर बाब अशी की अशा बॅग्जमध्ये कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह ठेवला तर त्यातून द्रव पदार्थ बाहेर येऊन कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा प्रचार होऊ शकतो. त्यामुळे हे कंत्राट रद्द झाले नाही तर मनसे याविरोधात आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देशपांडे यांनी दिलाय. या आरोपांवर बीएमसीनं स्पष्टीकरणही दिलं आहे.



बॉडी बॅग्जबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण


'कोविड कोरोना - 19' ने बाधीत झालेल्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह 'बॉडी बॅग'मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जच्या खरेदीच्या अनुषंगाने समाज माध्यमांवर चुकीची चर्चा सुरू आहे. तसेच भविष्यातील 'बॉडी बॅग्ज'ची संभाव्य गरज लक्षात घेऊन 23 मे 2020 रोजी काढण्यात आलेल्या निविदेला तांत्रिक दृष्ट्या सक्षम संस्थांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने सदर निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणाऱ्या 'बॉडी बॅग्स' या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत.


गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ‘सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखणे आणि बाधित रुग्णांवर योग्य आणि चांगले उपचार करणं महापालिकेचं काम आहे. परंतु, सध्याच्या कठीण काळात मुंबई महानगर पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. यामागे पेंग्विन गँग आहे. मनसेचा आरोप आहे की सध्या मुंबईत जी अल्प काळासाठी मोठ्या प्रमाणावर कोव्हिड सेंटर बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधांवर लाखोंचं भाडं आकारण्यात आलं आहे. कोव्हीड सेंटरमध्ये जे पंखे लावण्यात आले आहेत. त्यातील एका पंख्याचे दिवसाला 100 रुपये इतर भाडं आहे. मागील 90 दिवसांचा विचार केला तर एकुण खर्च एका पंख्याचा 9 हजार रुपये इतका येतो. यामध्ये नवीन पंखा विकत घेता आला असता.
‘धक्कादायक बाब म्हणजे ही कामं करत असताना कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता आपल्या जवळच्या लोकांच्या बगलबच्चांना याची कंत्राटे वाटण्यात आली आहेत’ असा आरोप संदिप देशापांडे ने केला.


Riksha-Taxi | रिक्षा,टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती