Mumbai MNS IPL Updates :  मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. Iplमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह वाहतूक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

  


आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळंच वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. 


महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही.  त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.


आयपीएलचा 15 हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु


आयपीएलचा 15 हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात रंगणार आहे.  हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहेत. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha






 




इतर महत्त्वाच्या बातम्या: 


TATA IPL 2022: तब्बल 8 संघाकडून खेळला 'हा' खेळाडू, मेगा ऑक्शनमध्ये ठरला अनसोल्ड; अखेर कोलकात्यानं घेतलं विकत, चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास