Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत घट होत असताना आज मात्र किंचित वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज नवे 50 कोरोनाबाधित आढळले असून कालच्या तुलनेत ही संख्या 23 ने अधिक आहे. काल अर्थात सोमवारी 27 नवे कोरोनाबाधित आढळले होते. मुंबई पालिका क्षेत्रात आज देखील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 50 कोरोनाबाधित आढळले असून 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 324 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 50 रुग्णांपैकी 4 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 468 बेड्सपैकी केवळ 108 बेड वापरात आहेत.


कोरोना रुग्ण दुपटीचा दर 14 हजार पार


मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दर आज थेट 14 हजारांपार पोहोचला आहे. सध्या कोरोना रुग्ण दुपटीचा दर 14686 दिवसांवर असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.



राज्यात 207 नवे कोरोनाबाधित


मागील 24 तासांमध्ये राज्यामध्ये 207 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 290 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही  2,295 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत सध्या 334 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha