मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुपुत्र अमित ठाकरे  यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. अमित ठाकरे यांनी  फेसबुकवर आपल्या लाडक्या लेकाची पहिली झलक शेअर केली. बाळाने चिमुकल्याच्या हाताने अमित ठाकरे यांची करंगळी पकडलेला हा फोटो असून तो शेअर करताना अमित ठाकरे यांनी हार्टची इमोजी वापरली आहे. या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.


अमित ठाकरे यांनी बाळाचा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लव्ह आणि लाईक्स पाऊस पडला आहे. तर हजारो जणांनी कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमित ठाकरे यांच्या बाळाचं नामकरण अद्याप झालेलं नाही. त्यामुळे नव्या राजकुमाराचं नाव काय ठेवणार याचीही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.



दरम्यान याच महिन्यात 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. ठाकरे कुटुंब नुकतंच कृष्णकुंज हे निवासस्थान सोडून शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी राहायला गेलं. तिथे राहायला गेल्यानंतर नव्या वास्तूत लगेचच चिमुकल्याचं आगमन झालं. 


नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतं आहे. राज ठाकरेंना नातू झाला ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले.


व्यंगचित्रकार, वक्ता, राजकारणी असे राज ठाकरे सगळ्यांनीच पाहिले आहेत. आता अमित ठाकरे यांच्या बाळामुळे राज ठाकरे आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.


कोण आहेत अमित ठाकरे यांच्या पत्नी?


अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी झाला होता. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली बोरुडे या फॅशन डिझायनर आहेत. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.


अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोदार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होते. तेव्हाच या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या घरच्यांना आपल्या नात्याबद्दल सांगितलं. कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha