Maharashtra Azaan Row : मशिदीवरून लाऊडस्पीकर काढले नाहीत तर हनुमान चालिसा सुरु करा, असं आवाहन राज ठाकरेंनी केल्यानं त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. तर, दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची एक कृती चर्चेत आली आहे.  पुण्यातील शिरूरमध्ये भाषण सुरु असताना मशिदीत सुरू असलेल्या अजानचा आवाज कानी वळसे पाटील यांच्या कानी पडला. त्यानंतर पाटील यांनी भाषण थांबवलं आणि उपस्थितांनाही शांत राहण्यास सांगितलं. 


राज ठाकरे यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या या कृतीची चर्चा सुरु झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शिरूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आला. त्यावेळी वळसे-पाटील यांनी भाषण थांबवलं आणि कार्यकर्त्यांनाही शांत राहण्यास सांगितले. 


पाहा व्हिडिओ: गृहमंत्र्याच्या भाषणावेळी सुरू झाली अजान अन्...



राज ठाकरे काय म्हणाले?


''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला होता. 'मनसे'च्या गुढी पाडवा मेळाव्यात त्यांनी हा इशारा दिला होता.  


राज यांनी मनसेच्या मेळाव्यात इशारा दिल्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील विविध ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंगे लावलेल्या मशिदीसमोर हनुमान चालिसा मोठ्या आवाजावर लावण्यास सुरुवात केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha