Mumbai Crime News मुंबई: प्रँक करण्याच्या नावाखाली मुलींचे बळजबरीने व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाला मनसे नेते मनोज चव्हाण आणि कांजूरमार्गच्या स्थानिक नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केल आहे. 


इरफान अहमद मजीद अहमद असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. रक्षाबंधनच्या दिवशी तो कांजूरमार्गच्या अशोकनगर भागात (Mumbai Crime News) मोबाईलमधून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींचे व्हिडीओ काढत होता. मुलींनी विरोध केल्यानंतरही त्याने पाठलाग करून या मुलींचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला.


आरोपीला अटक-


सदर प्रकरणाची माहिती मनसे नेते मनोज चव्हाण आणि स्थानिक नागरिकांना कळताच त्यानी या तरुणाला पकडले आणि त्याला चोप दिला. आपण प्रँक व्हिडीओ तयार करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय?


सदर संपू्र्ण प्रकार मुंबईतील कांजूरमार्ग येथे घडला आहे. 19 ऑगस्ट रोजी दुपारी दातार कॉलनी येथे एक युवक वाडेगती बिल्डिंगच्या जवळ बाईकवर बसून काही  मुली तिथे फिरत होत्या त्यांचे व्हिडीओ शुटिंग करत होता. आज आता दुपारी दातार कॉलोनी येते एक मुस्लिम युवक वाडेगती बिल्डिंगच्या जवळ बाईकवर बसून काही  मुली तिथे फिरत होत्या त्यांचे व्हिडीओ शुटिंग करत होता. मुलींना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. यावेळी बाजू्च्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या एमएसईबीच्या लोकांनी आजूबाजूच्या रिक्षा चालकांच्या मदतीने त्याला पकडले. यानंतर मनसे नेते मनोज चव्हाण यांनी देखील संबंधित आरोपीला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपी अशोक नगर येथील एका दुकानात काम करतो. 


मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्‍याकडून विनयभंग-


मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात दोन सख्या अल्पवयीन मुलींचां विनयभंग झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे.सध्या खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


संबंधित बातमी:


'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झाडलं, सुनावणीतील 10 मोठे मुद्दे