MNS Deepotsav 2022 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीनं आज मुंबईतल्या (Mumbai) शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, सेना भवनाच्या बाहेरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे, यंदाचा दिपोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे, मनसे-भाजपच्या युतीचं पुढचं पाऊल असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी भव्य दिव्य स्वरूपात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, यंदा दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर शिवसेना भवनाच्या थेट समोरच लागले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मनसे आणि भाजपची जवळीक वाढली आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनसेच्या दीपोत्सवाला हजेरी लावत असल्यानं भविष्यात मनसे-भाजप युतीकडे वाटचाल आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 


राज ठाकरेंचं पत्र अन् भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार 


काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, राज ठाकरे आणि देवेंद्रफडणवीस यांच्यातील भेटीगाठींचं सत्रही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं असून प्रचार सभांना सुरुवात झाली होती. या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात होती. पण राज ठाकरेंनी फडणवीसांना भावनिद साद घालत निवडणुकीतून माघार घेण्याचं आवाहन केलं. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपनं या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. महत्त्वाचं म्हणजे, या पत्राच्या शेवटी राज ठाकरेंनी पत्राच्या शेवटी आपला मित्र असा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या होत्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Diwali 2022 : शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे एकत्र येणार