फेरीवाल्यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीनं कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं.
मनसेबाबत ‘ते’ आरोप बिनबुडाचे : बाळा नांदगावकर
'हायकोर्टाने आधीच 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना मनाई केलेली आहे. आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुलं पाठवण्याची हौस नाही. पण अनधिकृत फेरीवाल्यांना किती काळ आम्ही सहन करायचं, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं' असं नांदगावकर म्हणाले.
एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.