मनसेची गुंडगिरी सुरु राहायला हवी, असा भाजपचा प्लॅन आहे. मात्र या देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल. हाणामारी हा काही पर्याय असू शकत नाही, हे मी मनसेला सांगू इच्छित आहे," असं संजय निरुपम मनसे आणि भाजपला उद्देशून म्हणाले.
मनसेमधील हफ्तेखोर नेत्यांची माझ्याकडे यादी
मनसेमधील कोणते नेते फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात, यांची नावानिशी माझ्याकडे यादी आहे, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. मात्र नावं सांगू शकत नाही, कारण तो कायदेशीर व्यवहार नसतो, असंही ते म्हणाले.
फेरीवाले पाकिट मारत नाहीत, मेहनत करतात
स्टेशनच्या एन्ट्री-एक्झिटवर फेरीवाल्यांनी बसायला द्या, अशी माझी भूमिका नाही. फेरीवाले गरीब आहेत, त्यांना संरक्षण दिलंच पाहिजे. गरिबांची रोजी-रोटी हिसकावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. कुणीही व्यक्ती इतर शहरात गेल्यावर काम मिळेपर्यंत फेरीवाल्याचा धंदा करतो. फेरीवाले चोर नाहीत, कुणाचं पाकिट मारत नाही, ते मेहनत करतात." असे सांगत संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचं पुन्हा एकदा समर्थन केले.
गरिबांसाठीच्या पोटा-पाण्याच्या प्रश्नात भाषेचा विषय आणू नये. फेरीवाल्यांमध्ये हिंदी-मराठी असा वाद आणू नका, सर्व भाषिक फेरीवाले आहेत, असे सांगत निरुपम यांनी मनसेवर निशाणा साधला.
माझ्यासाठी फेरीवाल्यांचा विषय सामाजिक
'कुठलंही शहर स्थलांतरितांसाठी खुलं होत नाही, तोपर्यंत विकसित होऊ शकत नाही. पुण्यातही जगभरातील लोक आले म्हणून पुण्याची ओळख 'आयटी हब' अशी झाली,' असे सांगताना संजय निरुपम पुढे म्हणाले, "मतांसाठी मी राजकारण करत असल्याचा माझ्यावर आरोप आहे. फेरीवाल्यांचा विषय हा माझ्यासाठी सामाजिक विषय आहे, राजकीय नाही."
मुंबईतील शिववडपाव स्टॉल अनधिकृत
"मुंबईत पाच लाखांपेक्षा जास्त फेरीवाले आहेत. शिववडापाव स्टॉल आहेत. एकाही शिववडापाव स्टॉलला परवानगी नाही. सगळे शिववडापाव स्टॉल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत," असं निरुपम यांनी सांगितलं.
'माझा कट्टा'तील महत्त्वाचे मुद्दे :
- स्टेशनच्या एन्ट्री-एक्झिटवर फेरीवाल्यांनी बसायला द्या, अशी माझी भूमिका नाही - संजय निरुपम
- फेरीवाले गरीब आहेत, त्यांना संरक्षण दिलंच पाहिजे - संजय निरुपम
- गरिबांची रोजी-रोटी हिसकावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही - संजय निरुपम
- स्टेशनजवळ फेरीवाल्यांनी बसू नये - संजय निरुपम
- जोपर्यंत फेरीवाल्यांच्या बसण्याची सोय करत नाही, तोपर्यंत अॅक्शन घेऊ नका, असा कायदा सांगतो - संजय निरुपम
- गौतम अदानीला 24 तासात क्लीन चिट मिळते, मात्र गोर-गरिबांसाठी कायदा अंमलात आणत नाही - संजय निरुपम
- फूटपाथवरील फेरीवाल्यांसाठी हॉकिंग झोन तयार करुन द्या - संजय निरुपम
- फेरीवाल्यांमध्ये हिंदी-मराठी असा वाद आणू नका, सर्व भाषिक फेरीवाले आहेत - संजय निरुपम
- कुणीही व्यक्ती इतर शहरात गेल्यावर काम मिळेपर्यंत फेरीवाल्याचा धंदा करतो - संजय निरुपम
- फेरीवाल्यांचा कायदा लागू करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली होती - संजय निरुपम
- गरिबांसाठीच्या पोटा-पाण्याच्या प्रश्नात भाषेचा विषय आणू नये - संजय निरुपम
- फेरीवाले चोर नाहीत, कुणाचं पाकिट मारत नाही, ते मेहनत करतात - संजय निरुपम
- एलफिन्स्टन दुर्घटनेला फक्त फेरीवाले जबाबदार नाहीत - संजय निरुपम
- 5 लाखांपेक्षा जास्त कुटुंब फेरीवाल्यांचे आहेत - संजय निरुपम
- एकाही शिववडापाव स्टॉलला परवानगी नाही, सगळे सेनेच्या कार्यकर्त्यांना स्टॉल दिलेत - संजय निरुपम
- फेरीवाले हे या देशाचे नागरिक आहेत, स्वरक्षणाचं प्रयत्न करायलाच हवेत - संजय निरुपम
- मतांसाठी मी राजकारण करत असल्याचा माझ्यावर आरोप - संजय निरुपम
- फेरीवाल्यांचा विषय हा माझ्यासाठी सामाजिक विषय आहे, राजकीय नाही - संजय निरुपम
- कुठलंही शहर स्थलांतरितांसाठी खुलं होत नाही, तोपर्यंत विकसित होऊ शकत नाही - संजय निरुपम
- जगभरातील लोक पुण्यात आले म्हणून पुण्याची ओळख 'आयटी हब' अशी झाली - संजय निरुपम
- गरीब, मध्यम वर्ग अशा सर्वांमुळे समाज बनतो, केवळ आयटीवाल्यांमुळे बनत नाही - संजय निरुपम
- हप्ते घेण्यासारखे नीच काम मी करत नाही - संजय निरुपम
- मनसेमधील कुठले नेते हप्ते घेतात, हे मला नावानिशी माहित आहे - संजय निरुपम
- हाणामारी हा काही पर्याय असू शकत नाही, हे मी मनसेला सांगू इच्छित आहे - संजय निरुपम
- या देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल - संजय निरुपम
- फेरीवाल्यांविरोधातील मनसेच्या आंदोलनामागे भाजपचा हात - संजय निरुपम
- मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी सुरु राहायला हवी, असा भाजपचा प्लॅन आहे - संजय निरुपम
पाहा संपूर्ण 'माझा कट्टा'