अजित डोवालांच्या मुलाची पाकिस्तानी व्यापाऱ्यासोबत भागीदारी, राज ठाकरेंनी दाखवले पुरावे
लोकसभा निवडणुकीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करेन, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी तरी मनसे महाआघाडीच्या वळचणीला जाणार नाही, असे संकेत राज ठाकरेंच्या बोलण्यातून मिळत आहेत. VIDEO | ठाकरे स्टाईलमध्ये प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोलकाही दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात येतील त्यांना सोबत घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या विरोधी भूमिकेमुळे मनसेच्या आघाडीप्रवेशाला खीळ बसू शकते.
राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांच्या पक्षाचे विचार काँग्रेसशी जुळत नाही, त्यामुळे महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं अशोक चव्हाण यांनी 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या विशेष कार्यक्रमात पुन्हा स्पष्ट केलं होतं.