नवी मुंबई: शिवडी न्हावा शेवा सेतूसाठी जमिनी घेताना एमएमआरडीने शेतकऱ्यांना दिलेली रक्कम मान्य नसून 2013 च्या कायद्यानुसार चौपट भाव द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. हा प्रकल्प सुरू करताान एमएमआरडीएने फक्त 50 हजार रुपये प्रति गुंठा असा भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.


भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूसाठी (Nhava Sheva Atal Setu) शेतकरी वर्गाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सागरी सेतू उभारताना चिर्ले आणि जासई गावातील 25 शेतकऱ्यांच्या जमिनी एमएमआरडीएने हस्तांतरीत केल्या. मात्र त्यांना मोबदला देताना 2013 च्या कायद्यानुसार चौपट भाव न देता फक्त गुंठ्याला फक्त 50 हजार रूपयांचा मोबदला दिल्याचं समोर आलं आहे.


या विरोधात शेतकऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली असता न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत सध्याच्या रेडी रेकनर दराच्या चौपट मोबदला द्यावा असे आदेश दिले आहेत. यानुसार गुंठ्याला साधारण 90 लाख ते एक कोटी रूपये  शेतकऱ्यांना मिळू शकतात. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारने त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे  12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi)  हस्ते उद्घाटन झालं. 


कसा आहे ट्रान्स हार्बर लिंक रोड? 


मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू  शिवडी इथून सुरू झाला ज्या ठिकाणावरून एम टी एच एल ची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रिमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो. एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असेल. 


कसा आहे पूल?


- MTHL पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.
- या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
- मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई येथे SH-54 आणि NH-348 वर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
- 90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत. 
- या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. 
- मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे. इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल. 
- ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता


ही बातमी वाचा: