मुंबई: उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी विधानपरिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे विधानपरिषदेच्या जागा 11 आणि उमेदवार 12 असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, हे निश्चित आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार विधानपरिषदेच्या (VidhanParishad Election 2024) 8 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, तर एका जागेवरुन काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav) आणि शेकापच्या जयंत पाटील यांना निवडून आणण्याइतपत संख्याबळ मविआकडे आहे. मात्र, तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला वरच्या मतांची जुळवाजुळव करावी लागणारी आहे. याच जागेवरुन उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवून राजकीय जुगार खेळला आहे.
मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता ते निवडणुकीत चमत्कार करु शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे ते महायुतीमधील कोणत्या पक्षाची मतं फोडून स्वत: निवडून येणार, अशी चर्चा कालपर्यंत सुरु होती. मात्र, बुधवारी विधानभवनात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक खळबळजनक शक्यता वर्तविली आहे. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो, असा सरनाईक यांचा अंदाज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत बंड होण्याच्या आदल्या रात्री झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत हमखास निवडून येण्याची खात्री असलेल्या काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
मिलिंद नार्वेकर हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. मलाही त्यांना विधान परिषदेच्या सभागृहात बघायला आवडेल. खरंतर २५ वर्षांपूर्वीच ते या सभागृहात असायला हवे होते. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला. आताच्या निवडणुकीत त्यांच्या येण्याने शेकापचे जयंत पाटील व काँग्रेसच्याच उमेदवाराला धोका वाढला आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
महाविकास आघाडी
राष्ट्रवादी शरद पवार - 12
उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16
काँग्रेस - 37
एकूण - 65
महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.
छोटे घटक पक्ष
1) बहुजन विकास आघाडी - 3
2) समाजवादी पक्ष - 2
3) एमआयएम - 2
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
5) शेतकरी कामगार पक्ष - 1
एकूण - 9
महाविकास आघाडी एकुण आमदार - 65
महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष
1) समाजवादी 2
2) एमआयएम 2
3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1
4) शेतकरी कामगार पक्ष 1
महाविकास पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार
महायुती आमदारांची संख्या
राष्ट्रवादी (अजित पवार) 41
भाजपा - 103
शिवसेना - 38
महायुती पाठींबा देणारे आमदार
राष्ट्रवादी (अजित पवार)
1) देवेंद्र भुयार
2) संजयमामा शिंदे
राष्ट्रवादी + अपक्ष - 43
भाजपला पाठिंबा देणारे आमदार
1) रवी राणा
2) महेश बालदी
3) विनोद अग्रवाल
4) प्रकाश आवाडे
5) राजेंद्र राऊत
6) विनय कोरे
7) रत्नाकर गुट्टे
भाजप+ मिञ पक्ष आणि अपक्ष
१०३+ ७= ११०
एकनाथ शिंदे शिवसेना- ३८
पाठींबा देणारे आमदार - १०
१) नरेंद्र भोंडेकर
२) किशोर जोरगेवार
३) लता सोनवणे
४) बच्छु कडू
५) राजकुमार पटेल
६) गीता जैन
७) आशीष जैसवाल
८) मंजुळा गावीत
९) चंद्रकांत निंबा पाटील
१०) राजु पाटील
एकूण - शिवसेना+ मिञ पक्ष आणि अपक्ष= ३८+ १०= ४८
महायुती एकुण आमदार - २०१
आणखी वाचा