Mhada Lottery 2024 : मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (Mhada) जाहीर करण्यात आलेल्या 2030 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून 1,34,350  अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत यापैकी  1,13,811 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. मुंबई (Mumbai) मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो. मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजता संपुष्टात आली व अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी देखील रात्री 11.59 पर्यन्त मुदत देण्यात आली होती. 27 सप्टेंबर, 2024  रोजी सायंकाळी  6.00 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 29 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती अर्जदारांना दाखल करता येणार आहेत. 3 ऑक्टोबर, 2024 रोजी सायंकाळी 6.000 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
          
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी  9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 11.00 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS 2.0 संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या सोडतीचे विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये  नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये 1327 सदनिकांचा समावेश आहे तर दुसर्या  गटामध्ये विकास नियंत्रण निमयमावली 33 (5), (7),58  अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या 370 सदनिकांचा समावेश आहे. तसेच तिसर्याक गटांतर्गत मागील सोडतीतील विविध वसाहतीतील  विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे. उत्पन्न गट निहाय या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण 359 सदनिकांकरीता 50,993 अर्ज सादर झाले आहेत व  त्यापैकी  47,134 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अल्प उत्पन्न गटातील एकूण 627 सदनिकांकरीता  61,571 अर्ज प्राप्त झाले आहेत व त्यापैकी 48,762 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. 


मध्यम उत्पन्न गटातील एकूण ७६८  सदनिकांकरीता १४,२९३  अर्ज सादर झाले आहेत व त्यापैकी  ११,४६१ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे . तसेच उच्च उत्पन्न गटातील एकूण २७६ सदनिकांकरीता  ७४९३ अर्ज  प्राप्त झाले आहेत व त्यापैकी  ६४५४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांचा लाभलेला प्रतिसाद पाहता विकास नियंत्रण निमयमावली ३३ (५) अंतर्गत गटातील नेहरू नगर , कुर्ला या योजनेतील १४  सदनिकांकरीता एकूण ४०२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१२४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तर ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरीता एकूण ७६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ५४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच  सिद्धार्थ नगर , गोरेगाव  येथील २ सदनिकांकरीता एकूण ७४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ६०२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच कन्नमवार नगर , विक्रोळी (४९२ ) या योजनेतील २ सदनिकांकरीता एकूण ६२० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ४४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.  तसेच विकास नियंत्रण निमयमावली ३३ (७) अंतर्गत भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता ५३३ अर्ज प्राप्त झाले असून यापैकी ४२२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.   तसेच मुंबई  मंडळातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी,  म्हाडा कॉलनी मालाड(४८६)  या योजनेतील एका सदनिकेकरिता  ४१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २९१ र्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड(४७७)  या योजनेतील ४५  सदनिकांकरीता ११,२८० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ९,५१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.  अर्जदारांच्या प्रतिसादाचा ओघ पाहता मुंबईतील परवडणार्याअ दारातील घरांची गरज अधोरेखित होते. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ८ ऑक्टोबर,  २०२४ रोजी दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे.


हेही वाचा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार