Mhada Lottery Update : मुंबईमध्ये (Mumbai) घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाकडून (Mhada Lottery 2023) लवकरच 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Mhada Konkan Lottery) लवकरच 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात ही सोडत जाहीर होईल अशी शक्यता आहे.  म्हाडामध्ये ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळे लवकरच म्हाडाटच्या कोकण मंडळाकडून या सदनिकांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे.


लवकरच 4721 घरांसाठी सोडत 


म्हाडा कोकण मंडळाकडून 2022 मध्ये घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबली. संगणकीय प्रणालीतील बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याने 2022 मध्ये कोकण मंडळाकडून सोडत काढण्यात आली नाही. दरम्यान, आता म्हाडाची नवीन सोडत प्रक्रिया आणि नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाल्याने सोडतीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडा कोकण मंडळाने सोडतीमधील घरांची संख्या वाढली आहे. लवकरच 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येण्याची शक्यता आहे.


येत्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता


म्हाडाच्या कोकण विभागात नवीन घरांची भर पडली आहे. ठाणे येथील विहंग समूहाच्या प्रकल्पातील 20 टक्के योजनेतील 256 घरे आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरांची यामध्ये भर पडली आहे. याअनुषंगाने म्हाडाच्या जाहिरातीतही काही बदल करावे लागणार आहेत. परिणामी ही सोडत जाहीर करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो.


17 ते 20 लाख रुपयांत घर उपलब्ध


म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4721 घरांसाठी येत्या आठवड्यात सोडत काढण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये 20 टक्क्यांतील आणि पंतप्रधान आवास योजनेमधील सुमारे 550 नवीन घरे नुकतीच मंडळाला उपलब्ध झाली. त्यामुळे ही 500 घरे म्हाडाच्या योजनेत समाविष्ट करण्यात येत आहेत. यामुळे म्हाडातील आता घरांची संख्या वाढली आहे. 


म्हाडाला उपलब्ध झालेल्या ही वाढीव घरे अल्प गटासाठी आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 300 चौरस फुट असून त्यांची किंमती 20 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच विरार महानगरपालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेतील अंदाजे 300  घरे म्हाडाला अपलब्ध झाली आहेत. ही घरे अत्यल्प गटासाठी आहे. ही घरे अंदाजे 300 चौरस फुटांची आहेत आणि त्यांची अंदाजे किंमत 17 लाख रुपयांपर्यंत आहे.