मुंबई : अनलॉक 4 साठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करायला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे मुंबईत मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंदच राहणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज्य सरकारने अनलॉक 4 साठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात शाळा, कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच असणार आहेत. केवळ कंटेनमेंट झोन बाहेर 50 टक्के शिक्षक आणि स्टाफला ऑनलाईन वर्गासाठी शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये नवजात बालकांच्या आरोग्याशी खेळ, बीसीजी, पोलिओच्या लसीकरणात प्रचंड घट
यापुढे केंद्राशी चर्चेशिवाय कंन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
अनलॉक 4 मधील महत्वाचे मुद्दे
- 7 सप्टेंबरपासून देशात रेल्वे सेवा सुरू होणार
- 21 सप्टेंबरपासून सोशल अॅकेडमिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी 100 लोकाचं बंधन असणार आहे.
- 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थियटर्स उघडण्यास संमती.
- शाळा आणि महाविद्यालय 30 सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार.
- 9 वी ते 12वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालया जाऊ शकतात. मात्र, यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
- कंटेनमेंट झोन मध्ये चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आणि थियटर्स बंदच राहणार आहेत. याठिकाणी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.
- लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी सध्या असलेली माणसं जमवायची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत कायम राहील. २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी
Unlock 4.0 Guidelines | अनलॉक 4.0साठी केंद्र सरकारची नवी नियमावली, काय सुरू आणि काय बंद राहणार?