आपल्या लाडक्या बायकोसह हौस मौज करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून दीपक सलगरे हा महागड्या दुचाक्या चोरी करून त्या विकत होता. या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सलगरे हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा त्यानंतर या दुचाक्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून गरजु लोकांना स्वस्तात दुचाकी विकायचा,काही दुचाक्या भंगारवाल्याला विकायचा हा भंगारवाला दुचाकी तोडून भंगारात विकायचा.अखेर या टोळीचा परदाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय.दीपक सलगरे सह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कल्याण डीसीपी संजय गुंजाळ यांनी नागरिकांनी स्वस्त दुचाकीचा आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाक्या विकत  घेऊ नये असं आवाहन नागरिकांना केलंय अन्यथा इथून पुढे अशा दुचाक्याविकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे. 


कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरट्याच्या मागावर पोलिस होते. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी  स्वतंत्र पथकाची स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने या परिसरात दुचाकी चोरी झालेले आहेत त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील लक्ष ठेवले. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक विरोधात आजमितीला मानपाडा,कोळसेवाडी, विठ्ठल वाडी, अंबरनाथ ,नारपोली ,उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत.


अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती. दीपक मोटरसायकल चोरी करायचा व ती मोटर सायकल त्याचा साथीदार राहुल डावरे यांच्या मदतीने नागरिकांना स्वस्त गाड्यांचे आमिष दाखवून विकायचा या गाड्या फायनान्स कंपनी मधून खेचून आणल्या आहेत असे आमिष  तो ग्राहकांना देत या चोरीच्या गाड्या त्यांच्या माथी मारत होता तसंच काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या  चिनमून चौहान उर्फ बबलू यांनादेखील विकल्या, बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या चौहान ,समशेर खान,भैरवसिंग खरवड यांच्या मार्फत इतराना विकत होता.पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरे सहा सहा जणांना ताब्यात घेतलं या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी 17 दुचाक्या 23 दुचाक्यांचे  इंजिन इतर पार्ट्स ,एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार यांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात; वीजबिलाच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधानपरिषदेतून सभात्याग


नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; 'त्या' ट्वीट विरोधात पोलिसांत तक्रार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha