Maharashtra Winter Assembly Session : भरती घोटाळा चर्चेत असताना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी खळबळजनक (Nawab Malik On Exam Scam) आरोप केला आहे. भरती घोटाळा हा 2017 सालापासून सुरू होता. संपूर्ण भरती प्रक्रिया घोटाळ्यात व्यापम घोटाळ्यातील काही लोकं होते. कौस्तुभ नावाची व्यक्ती होती ज्याला ओएसडी म्हणून देखील नेमण्यात आले होते. यांच्या माध्यमातून घोटाळे करण्यात येत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदावरुन बोलताना ते म्हणाले की, अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या बाजूने आहे. आमचं म्हणणं आहे की संसदेत उघड मतदान पद्धतीने होत असेल तर इथं का नाही. त्यांना वाटत असेल की आमच्याकडे बहुमत नाही. तर माझं म्हणणं आहे त्यांना की त्यांनी आमच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना कार्यक्रम पत्रिकेवर लक्षवेधी सूचना घेण्यात येणार आहे. 4 विषय आम्हाला पारित करायचे आहे, असंही ते म्हणाले.
मलिक म्हणाले की, जिथं गरज आहे तिथं मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांची जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. परंतु ज्याप्रकरे यावर सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर त्यांची मानसिकता दिसून येत आहे, असं ते म्हणाले.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपची लोकं आणि बेजबाबदार नेते या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रकारे मंत्र्यांना धमक्या येत आहेत याचा तपास व्हायला हवा. दाभोलकर यांची हत्या करणारी संघटना तर याच्या मागे नाही ना? याची चौकशी व्हायला हवी. गृहखातं हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास करेल. आणि यामागे ती संघटना तर नाही ना याचा तपास करेल, असंही ते म्हणाले.
मलिक म्हणाले की, प्रवीण दरेकर खोटं बोलत आहेत हे स्पष्ट आहे. त्यांनी शपथपत्रावर नमूद केलं होतं की त्यांची प्रॉपर्टी 4 कोटी दाखवली होती. एकीकडे ते मजूर दाखवतात आणि दुसरीकडे त्यांची संपत्ती जास्त आहे. एखादी व्यक्ती शपथपत्राबाबत खोट बोलत असतील तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha