ठाणे : व्हॉट्सअॅपवरुन ट्रिपल तलाकचा मेसेज पाठवून पत्नीला घटस्फोट देणाऱ्या एका 28 वर्षीय इसम आणि त्याच्या आई वडिलांविरोधात ठाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा कल्याणचा रहिवासी आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये मुस्लीमांमधील ट्रिपल तलाक हा निरर्थक, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणी एका 25 वर्षीय महिलेने भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये मागील आठवड्यात तक्रार नोंदवली होती. तिचा 18 मे 2014 रोजी आरोपीसोबत विवाह झाला होता आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. ही महिला सध्या भिवंडीत तिच्या नातेवाईकांच्या घरात राहत आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, "सासू-सासरे सातत्याने आपल्याला छळत होते. काही दिवसांपूर्वी नवऱ्याने माझ्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली आणि घराबाहेर काढलं. यावर्षी 12 मार्च रोजी मला नवऱ्याने व्हॉट्सअॅपवर तलाक तलाक तलाक, असा मेसेज पाठवला. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने नकार दिला."

संबंधित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिचा नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात आयपीसीच्या विविध कलम आणि मुस्लीम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे तलाक-ए-बिद्दत?
एकाच वेळी 3 वेळा तलाक बोलण्याच्या प्रथेला तलाक-ए-बिद्दत म्हणतात. इस्लामी विद्वानांच्या मते, कुराणात अशा प्रकारची तलाक व्यवस्था नाही. मूळ व्यवस्थेत तलाक बोलण्यासाठी 1 महिन्याचं अंतर असतं. या काळात पती-पत्नीमध्ये समेट होऊ शकतो.

एकाच वेळी तीनदा तलाक बोलण्याची प्रथा पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर सुरु झाली. अनेक इस्लामी देशात याला मान्यता नाही. पण भारतात आजही ही प्रथा कायम आहे. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 70 टक्के सुन्नी पंथातील उलेमा याला मान्यता देतात. 1937 मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ अप्लिकेशन अॅक्टच्या सेक्शन 2 मध्ये याविषयी तरतूद आहे.

संबंधित बातम्या

तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाकमध्ये फरक काय?

तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी

ट्रिपल तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची सुरुवात

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज…शायरा बानो

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?