Maharashtra weather Live Updates : येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
Heavy Rain forecast: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर परिसरातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
लातूर : मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी सुरु आहे. पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात पावसानं दररोज जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रोज संध्याकाळी पावसाला सुरुवात होत आहे. जोरदार वारा, ढगांचा गडगडाट यांच्यासह दररोज पाऊस किमान अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास हजेरी लावत आहे. अवघ्या काही दिवसात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. पेरणी लायक पाऊस झाला आणि पावसाने काही काळ उघडीप दिली तर पेरणीला वेग येईल... यामुळे बियाणं आणि खत बाजारामध्ये शेतकऱ्यांचा राबता वाढला आहे.
Latur Rain News : मागील अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, माळशिरस, मान या भागातून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ मेंढ्यांच्या कळपास लातूर भागात येत असतात. यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं उत्तम साथ दिली आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी आहे. पावसाची चाहूल लागल्याने हे मेंढपाळ आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. जिल्ह्याभरात 300 च्या आसपास मेंढपाळ आपल्या कळपासह लातूर जिल्ह्यात दाखल झाले होते. एका कळपात दीडशे ते दोनशे मेंढ्या असतात. आता हे सर्व मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मागील अनेक वर्षापासून या भागात नेमका येत असतात पावसाला सुरुवात झाली की ते परतीचा प्रवास सुरू करतात. यावर्षी परतीचा प्रवास पावसाने उत्तम साथ दिल्याने काही दिवस अगोदरच सुरू झाली आहे.
Latur Rain Crop Loss : लातूर जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या मान्सून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारं आणि ढगाच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागेच नुकसान मोठ्या प्रमाणात झाला आहे
Rain News : कोकणात सर्वाधिक पाऊस पडून नद्यांना पूर येत असतो. यातून विस्कळीत होणारे जनजीवन आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना निर्माण होणारा धोका यातून दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. यातूनच महसूल आणि पोलीस प्रशासनाला आपत्ती काळात नागरिकांसाठी मदत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले. त्यांना ट्रेनिंग देऊन नागरिकांना अडचणीच्या काळात कसे बाहेर काढायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज खेडमध्ये जगबुडी नदीत प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी आधुनिक बोटी सहित, प्लास्टिकचे कॅन प्लास्टिकचे बॉटल्स याचा वापर करून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या संदर्भात प्रात्यक्षिक करण्यात आले.
Maharashtra Rain News : परभणी जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झालाय. महत्त्वाचं म्हणजे पाथरी आणि मानवत या दोन तालुक्याला पावसाने जबरदस्त झोडपलं आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. मानवत तालुक्यातील मानोली येथील ओढ्यामध्ये दोन महिला वाहून गेल्या. रंजना भास्करराव सुरवसे आणि सुनिता धुराजी लवाळे या दोन महिला शेतातून येत असताना ओढ्याला पाणी आल्यामुळे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. यातील रंजना सुरवसे या सापडल्या असून त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुनिता लव्हाळे यांचा शोध गावकरी घेत आहेत.
Vikroli Two Death Due to Building Collapsed : मुंबईच्या पार्कसाईट विभागात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसात एका निर्माणआधीन इमारतीच्या काही भाग कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी असे मयतांची नावे आहेत. नागेश रेड्डी हे या इमारतीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रात्री साडे अकराच्या सुमारास नागेश रेड्डी हे कामावर आले होते. तेव्हा त्यांचा दहा वर्षाचा मुलगा रोहित हा त्यांचा जेवणाचा डब्बा घेऊन तिकडे आला. परंतु जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले. याच दरम्यान अचानक या इमारतीचा काही स्लॅब आणि लोखंडे ढाचा थेट त्यांच्यावर कोसळला आणि या घटनेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला.अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या इमारतीच्या सुरक्षेबाबत मयतांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.
Pune Rain News : रविवारी रात्री दौंड तालुक्यात नव्याने सुरु असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. या पुलाचे खांब कोसळले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 21 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती, परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या कामावरील पिलरचा एक भाग कोसळला. त्यामुळे या कामाची पात्रता काय, किती निकृष्ट दर्जाचे काम आहे, हे यावरून सिद्ध होते. जर काम सुरू असते आणि हा असा प्रकार घडला असता तर, नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.
Rain Update : मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.
Yavatmal Rain Loss : यवतमाळमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नरखेड तालुक्यातील मदान या गावातील एका शेतकऱ्याची संत्रा बाग जमीनदोस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पूर्व मौसमी पाऊस तर काही भागांमध्ये मान्सून चा पाऊस बरसतोय. अजूनही महाराष्ट्र व्यापायला दोन दिवस मान्सूनला लागणार आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असा आवाहन परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ञांनी केला आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये राज्यभरातील सर्वच भागांमध्ये मान्सून चांगल्या प्रकारे बरसणार आहे त्यानंतर परत तीन-चार दिवसांचा खंड पडणार आहे या खंडानंतर परत चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये जून महिन्यामध्ये यावर्षी सर्वांच्या पेरण्या सर्वांच्या अशा पद्धतीनेच आपल्याकडे पाऊस बरसणार आहे म्हणून आत्ताच शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये आपापल्या भागामध्ये 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.
अंबरनाथमधील मलंगडवाडीत दुर्घटना.मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मलंगडवाडीतील एका घरावर मलंगगड पहाडावरील दगड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. रात्री मलंगड परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता या पावसामुळे मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या राहत्या घरावर सकाळी सहाच्या दरम्यान पहाडावरील दगड कोसळल्याने गुलाम बादशाह सय्यद वय 35 व त्यांची पत्नी समीरा गुलाम सय्यद (वय 30) हे या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केले आहे.
रस्त्यावरील विजेच्या खांबाला करंट लागून तरुणाचा मृत्यू. नालासोपाऱ्यात महापालिकेच्या विजेच्या खांबाला शॉक लागून एका २९ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा पहिला बळी हा तरुण ठरला आहे. पालिकेचा गलथान कारभार याला दोषी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
काल रात्री दौंड तालुक्यात नव्याने सुरु असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. या पुलाचे खांब कोसळले आहेत.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 21 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे व धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या कामावरील पिलर चा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता काय किती निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते.जर काम सुरू असते तर आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.
नाशिक जिल्ह्यात काल पावसाने दमदार हजेरी लावली..मात्र या पावसामुळे देवळा तालुक्यातील उमराणे येथे कांद्याचे शेड कोसळून मोठे नुकसान झाले..या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला होता तर वीज कोसळून एक जण ठार झाला होता..दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी उमराणे येथील नुकसानीची पाहणी केली..तसेच अंगावर शेड कोसळल्याने मृत झालेल्या मुलाच्या घरी जावून सांत्वनपर भेट दिली..दरम्यान, राज्य शासन व केंद्र सरकारला या घटनेबाबत अवगत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे खा. भगरे यांनी यावेळी सांगितले.
देवळा तालुक्यातील उमराणे गावात झालेल्या वादळी पावसाने कांदा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी जिल्ह्यातील नेते घटनास्थळी जात आहे. पालकमंत्री दादा भुसे भाजप आमदार राहुल आहेर ,नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी पहाणी केली. कांदा शेड कोसळून देविदास अहिरे यांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेत खचून जाऊ नका, असा धीर पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ पंचनामा पूर्णकरून नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही शासकीय यंत्रणेला देण्यात आल्यात.
धाराशिवमध्ये राञी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात शिरले पावसाचे पाणी.
पावसाच्या पाण्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील महत्वाच्या फाइल्स आणि साहित्य भिजले. आपत्ती व्यवस्थापनात वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक बोट,दोरखंड व इतर साहित्य भिजले. आपत्तीच्या काळात मदत करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयावरच उभी ठाकली पावसाची आपत्ती
नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पावसाचा फटका. मध्यरात्री झालेल्या पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहराच्या काही भागासह ७० ते ८० गावांचा वीज पुरवठा खंडित. वीजनिर्मिती केंद्रातील १३२ के व्ही सब स्टेशनमधील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित. तांत्रिक बिघाड सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
मुंबईत रविवारी संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस झाला होता. सोमवारी पहाटेही पावसाची रिमझिम सुरु होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. हवामान ढगाळ असले तरी मुंबईत आणि उपनगरात फारसा पाऊस झालेला नाही.
पावसाळा सुरू झाला असून जुन महीन्यातील पहीला आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात 40.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या अपुऱ्या पावसावरच अनेक शेतकऱ्यांची चाढ्यावर मुठ धरली आहे त्यामुळे अशा वेळी बियाणे न उगवण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी साधारणपणे 80 ते 90 मिलीमीटर पाऊस झाल्याखेरीज पेरणीला सुरूवात करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडुन शेतकऱ्यांना केले आहे. दरम्यान जिल्ह्यात बहुतांश भागात आजही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही कुठे 30 टक्के तर कुठे 40 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जमीनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने याने यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
धाराशिव तालुक्यातील खानापुर गावात घरावर वीज पडल्याने घराचे नुकसान. राञी साडेआठ ते नऊच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसात घरावर पडली वीज. घरातील टिव्ही,फॅन,कुलर,एसीसह,फ्रीज जळाल्याने मोठे नुकसान. नुकसानीचा पंचनामा करुन शासनाने मदत देण्याची ग्रामस्थ जाधव यांची मागणी. धाराशिव शहरासह तालुक्यातील राञी विजेच्या कडकडाटासह झाला मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आल असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आदेश मच्छ विभागाने दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळं जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद या आठवड्याभरात झाली आहे. सोलापुरात अनेक वर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात एकूण 102 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना कालपर्यंत 103 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस देखील हे पाऊस असेच असण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल में महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापुरात बदललेल्या वातावरणामुळे बळीराजा सुखावला आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला आठवडाभरात झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आठवडाभर सर्व दूर पाऊस पाहायला मिळतोय. तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात साठा झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर जमिनीत वापसा होताच खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.
मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या वर्षासरींनी पुणेकरांना धडकी, पावसाने 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला. सविस्तर वाचा
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे. रात्री काही भागात जोरदार सरी झाल्या. पावसामुळे सध्या शेतीची कामं केली जात आहेत. भातशेतीच्या कामाला वेग
जालन्यातील जाफराबाद तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार आलेल्या वादळासह पावसाने तालुक्यातील काही गावांना नुकसान झाले असून या वादळात अनेकांचे घरांवरील पत्रे उडून गेले, जाफराबाद तालुक्यातील वडाळा गावाला वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय .या गावातील अनेक कुटुंबांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार आता उघड्यावर आले आहेत.
राज्यातील कोकण किनार पट्टीसह उत्तर महाराष्ट्रात पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
पहिल्याच पावसात मराठवाड्याला मोठा दिलासा. पहिल्याच पावसात जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू. जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात 4 हजार 837 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणात 4.50 टक्के पाणीसाठा. काल झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीत अर्धा टक्क्याने पाणीसाठा वाढला
नाशिक जिल्ह्यात काल दुपार नंतर रात्री उशिरा पर्यंत मेघगर्जनेसह वादळी वा-याने मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यातील उमराणे ,तिसगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने येथिल २० ते २५ कांदा व्यापा-यांचे मोठे लोखंडी शेड अक्षरशः कोसळून पडले. तर अर्धा किलोमीटर पर्यंत पत्रे लांबपर्यंत उडाले. साठवून ठेवलेला कांदा भिजला यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शिवाय साठवलेला कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात काल दुपार पासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते..रस्त्यावरील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली..एकंदरीतच पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मालेगावात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी. विजांचा कडकडाट , वादळ वाऱ्यासह, झाडांची पडझड व नागरिकांची तारांबळ उडवीत नाशिकच्या मालेगाव शहर व तालुका परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे..दरम्यान, या वादळी पावसामुळे मालेगाव परिसरातील काही वृक्ष उन्मळून पडले. गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत होते. आताही प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले चार दिवस सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्याने खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्याची शेतामध्ये पेरणीची लगबग दिसून येत आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुळ वाफेची पेरणी रोहिणी नक्षत्र पासून सुरू होती. ती आता जवळपास पूर्ण होत आली असल्याचे चित्र सध्या शिराळा तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी आपल्या शिवारात मशागती करून शेतजमीन तयार केलेली आहे. सध्या पेरणीसाठी वेळ योग्य असल्याने आणि पाऊस देखील मुबलक झाल्याने शेतकरी पेरणी करत आहे. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, मका, तूर,मटकी, उडीद चव्हाळा,अशा खरीप पेरण्या शेतकरी करताना दिसत आहे.
साताऱ्यात पाऊस नाही. घाटमाथ्यावरही पाऊस नाही. काल दुपारी तुरळक पाऊस महाबळेश्वर,पाचगणी,कोयना परिसरात झाला होता.
वाशिम जिल्ह्यात काल सर्व दूर अनेक भागात कुठे जोरदार तर हलका मध्यम पाऊस बरसला.
नाशिकच्या मनमाड, नांदगाव शहर व परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड शहरात सुमारे तासभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसाने शहराट सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.. पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझन नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले..तर नांदगाव शहर व परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून शेतात पाणी साचले..यंदा वेळेत पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या पेरणी कामाला सुरवात होणार असल्याने बळीराजा सुखवाला आहे.
Nashik Chandwad Rain Update LIVE: नाशिक जिल्ह्यात काल दुपार पासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. चांदवड शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. रस्त्यावरील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली. एकंदरीतच पहिल्याच पावसानं जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री जोरदार पावसाच्या सरी. मेहकर , लोणार , शेगाव परिसरात मुसळधार पाऊस
Nashik Malegaon Rain Update LIVE: विजांचा कडकडाट, वादळ वाऱ्यासह, झाडांची पडझड आणि नागरिकांची तारांबळ उडवीत नाशिकच्या मालेगाव शहर व तालुका परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या वादळी पावसामुळे मालेगाव परिसरातील काही वृक्ष उन्मळून पडले. गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत होते. आताही प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sangali Rain Updates: सांगली : गेले चार दिवस सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्याने खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्याची शेतामध्ये पेरणीची लगबग दिसून येत आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुळ वाफेची पेरणी रोहिणी नक्षत्र पासून सुरू होती. ती आता जवळपास पूर्ण होत आली असल्याचे चित्र सध्या शिराळा तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी आपल्या शिवारात मशागती करून शेतजमीन तयार केलेली आहे. सध्या पेरणीसाठी वेळ योग्य असल्यानं आणि पाऊस देखील मुबलक झाल्यानं शेतकरी पेरणी करत आहे. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, मका, तूर,मटकी, उडीद चव्हाळा,अशा खरीप पेरण्या शेतकरी करताना दिसत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. मुंबईच्या वसई हद्दीत हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने काही अवजड वाहनांची चाके रस्त्यातच रुतली आहेत तर यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छत्री घेऊनच घराबाहेर पडा! मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली, पुढील 24 तासांत रिमझिम पावसाच्या सरी. सविस्तर वाचा
मुंबई, ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मंगळवारपर्यंत हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट तर सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी.
मुंबईत रविवारी मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai Rain News) विविध ठिकाणी संध्याकाळपासून पाऊस पडताना पाहायला मिळाला. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर, काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळाले. दादर टीटी परिसरात पाणी साचलं होते. सविस्तर वाचा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या दमदार आगमनाने मुंबईकर सुखावून गेले. पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते.
विक्रोळी पार्कसाईट येथे घर कोसळून दोघांचा मृत्यू. विक्रोळी पार्कसाईट, कैलास बिझनेस पार्क, टाटा पॉवर हाऊसजवळील घटना. या घटनेत नागेश रामचंद्र रेड्डी ३८, रोहित रेड्डी १० या दोघांचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री उशिरा तळमजला धरून ४ माळ्याचं घर कोसळल्याची घटना घडली. यावेळी घराचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वीच दोघा जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह ठाणे, पालघर, जिल्ह्यात सोमवारी ते गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
मुंबई: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने राज्यात 6 जूनला प्रवेश केला होता. त्यानंतर रविवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले. त्यामुळे काल संध्याकाळपासून मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या परिसरात पावसाला (Heavy Rain in Maharashtra) सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. सोमवारीही मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -