उल्हासनगर : उल्हासनगर युवासेनेच्या कोट्यधीश असलेल्या युवा शहर अधिकाऱ्याची पत्नी चक्क उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. युवासेनेचा पदाधिकारी करोडपती आहे. मग त्याच्या पत्नीला सफाई कामगार म्हणून काम का करावे लागते असा सवाल आता उपस्थित होतोय.
सुशील पवार असे या युवासेना पदाधिकारी याचे नाव असून दीपाली पवार असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दीपाली पवार त्याच महापालिकेत सफाई कामगार आहेत. सुशीलकडे दोन मोठी हॉटेल, एक लहान मुलांचे हॉस्पिटल आणि एक सलून आहेत. मग त्यांच्या पत्नीला महापालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून का काम करावे लागते सवाल उपस्थित होतोय. शिवाय त्या पाच महिन्यापासून गैरहजर आहेत. त्या कामावर येतच नाहीत त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
दिपाली पवार या 12 वर्षापूर्वी महापालिकेत सफाई कामगार म्हणून नियुक्त झाल्या. त्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाले आहेत. लग्न झाल्यावर त्यांनी उल्हासनगरच्या लाल चक्की परिसरात आईस्क्रिम त्याचबरोबर चायनीजची गाडी टाकून व्यवसाय सुरू केला होता. या दरम्यान शिवसेशी या युवासेनेचे त्याची नाळ जोडली आणि त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला. युवासेनेत प्रवेश केल्यानंतर त्याने अवघ्या काही वर्षात शिवसेनेच्या पदाधिकार्यांची मनं जिंकली. पक्षाच्या माध्यमातून विविध कामं मिळत गेली आणि त्यामुळेच गेल्या बारा वर्षात मी शून्यातून एवढा मोठा विषय करू शकलो असं सुशील पवार असं म्हणणं आहे. शिवाय त्यांच्या मावस मानलेल्या भावाची वारसा पध्दतीने त्यांना नोकरी मिळाली.कामावर न येता पगार मिळतो असा आरोप आहे. दरम्यान हे सगळे आरोप त्यांचे पती सुशील यांनी फेटाळून लावलेत.
आता हे प्रकरण समोर आल्यावर नक्की या सफाई कर्मचारी बोगस आहेत का? याचा उलगडा होण्याची शक्यता आहेत. मात्र ही सफाई कामगार महापालिकेत काम करत असताना वारंवार गैरहजर होती आणि तरी देखील तिला महापालिकेकडून पगार दिला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावाखाली महापालिकेतील अधिकारी काम करत होते का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय