Crime News : आई-वडील रागावल्याने अल्पवयीन मुलांकडून टोकाचे पाऊल उचलले जात असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईत समोर आली आहे. मोबाइलवर सातत्याने गेम खेळत असल्याने आई रागावल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली असल्याचे खळबळजनक घटना घडली आहे. आईने रागावल्यानंतर मुलाने घर सोडले आणि लोकल रेल्वे समोर येत आत्महत्या केली. या अल्पवयीन मुलाने घरी सुसाइड नोट सोडली होती. बोरिवली रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरावर शोककळा पसरली आहे. 


बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. ओम भरत असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ओम दिवसभर मोबाइलवर गेम खेळत होता. त्याचवेळी संध्याकाळी ओमच्या आईने दिवसभर मोबाइलवर गेम खेळतो, मग अभ्यास कधी करणार असा जाब विचारत त्याच्या हातातून मोबाइल काढून घेतला. आई रागावल्याने ओमने रागाच्या भरात सुसाइड नोट लिहून घर सोडले. या पत्रात त्याने मी आत्महत्या करत  असून पुन्हा कधीच येणार नसल्याचे म्हटले. घरातल्यांनी सुसाइड नोट मिळताच दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ओमचा शोध सुरू केला. 


या दरम्यान  दिंडोशी पोलिसांना मालाड आणि कांदिवली दरम्यान एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना तो मृतदेह ओमचा असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


दुर्देवी! आई-वडील रागावले म्हणून 25 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल


आई-वडील रागावल्याने एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील उमरद येथे ही घटना घडली आहे. एका शुल्लक कारणातून युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत भारत जाधव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बीड तालुक्यातील उंबरद खालसा या गावाचा रहिवासी आहे चंद्रकांत हा भारत जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. बीडमध्ये शिवण काम करण्याचं काम करायचा. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने वडिलांनी त्याला फोन करून विचारणा केली. त्यावेळी तो नशेत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी वडिलांनी चंद्रकांतला त्यांनी  समज देऊन घरी लवकर येण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने घरी येत स्वत: च्या खोलीत जाऊन आत्महत्या केली.