Maharashtra Rain LIVE Updates : मुंबईसह राज्यातील पावसासंबंधीचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra , MumbazRain LIVE Update : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पाऊस. काही ठिकाणी पावसाची कोसळधार, तर काही ठिकाणी तुरळक सरी.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jul 2021 11:54 AM
रत्नागिरी : समुद्र खवळला, लाटांचा वेग वाढला, नदीकाठच्या गावाना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी  - जिल्हात सध्या पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे..जिह्यातील खेड, दापोली, मंडणगड याठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय.तर गावागावांतील नद्या ओसंडून वाहत आहेत तर काही नद्यांचे पाणी पुलावरुन वाहू लागले आहे..जिथे पुरस्थिती आहे तिथल्या नदीकाठच्या गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे..दापोली पाजपंढरी येथील समुद्र किनाऱ्यावर पडणारा मुसळधार पाऊस आणि लाटांचा वेग वाढला आहे. 

कल्याण ते कर्जत धावणाऱ्या आणि हार्बर लाईनच्या लोकल गाड्या या 20 ते 25 मिनीटे उशीरा धावतील

मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे लोकल ट्रेनवर त्याचा परिणाम झाला आहे. कल्याण ते कर्जत धावणाऱ्या आणि हार्बर लाईनच्या लोकल गाड्या या 20 ते 25 मिनीटे उशीरा धावतील असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मुंबईच्या मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई : मुंबईच्या मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीशेजारील क्रांतीनगर भागातून नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. या स्थलांतरित नागरिकांना पालिकेच्या शाळेत तात्पुरता आसरा देण्यात आलेला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी संततधार


सिंधुदुर्गात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात पावसामुळे गेल्या 6 दिवसांपासून घोडगे परमे फुल पाण्याखाली गेला असून 4 गावांचा संपर्क तालुक्याशी तुटलेला आहे. मालवण तालुक्यातील रमाई नदीची पाण्याची पातळी वाढल्याने नदीचे पाणी शेतीतून प्रवाहित होऊन वाहत असल्याने भात शेती वाहून जाण्याचा धोका आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याखाली गेलेली शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Mumbai Rain : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद

Mumbai Rain : मुंबईत पहाटे साडेतीन वाजेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सायन, गांधी मार्केट, हिंदमाता परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 


पार्श्वभूमी

Maharashtra Rain LIVE Update : मुंबई (Mumbai) आणि कोकणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यात मुंबईकरांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कारण पुढच्या तीन तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या 4 तासांपासून पावसांन झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 


मुसळधार पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर पावसामुळे लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे मुंबईच्या लाईफलाईनला ब्रेक लागला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प आहे. 


मुंबई पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचं अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, हिंद माता परिसर यासर्व परिसरात सध्या पाणी भरलेलं आहे. अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे सबवेच्या खाली दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे सर्व वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये सुद्धा पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.