मुंबई : शिवसेनेला ( Shiv Sena ) एका मागून एक धक्के बसत आहेत. ठाण्यातील (Thane) शिवसेनेचे 66 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता ठाण्या पाठोपाठ नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे 30 ते 32 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत.
आज रात्री नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हे नगरसेवक भेट घेणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे जेष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार आहेत. यामध्ये ऐरोली मतदारसंघातील जवळपास 90 टक्के नगरसेवकांचा समावेश आहे.
नवी मुंबईत शिसेनेचे 50 नगरसेवक आहेत. त्यामधील 30 ते 32 जण एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आगामी काळात उर्वरित नगरसेवकांना देखील गळाला लावण्याचं काम शिंदे गटाकडून होणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिनसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का आहे.
ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. याबरोबरच या पूर्वी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पदाचा राजीनामा दिला आहे. तर डोंबिवलीतील शिवसेनेचे उपशहराध्यक्ष राजेश कदम यंनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी 16 पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे. त्यानंतर ठाण्याचे 66 नगरसेवक आणि आता नवी मुंबईतील नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात