मुंबई : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मिरा बोरवणकर (Mira Borvankar) यांच्यावर देखील भाष्य केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मीरा बोरवणकर या कधीही वादग्रस्त ठरणार नाही. त्यामुळे त्यांचे आरोप गंभीर आहे. मी पुस्तक वाचलं नाही. पण मी कितीही मागणी केली तरी त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. त्यामुळे काहीच होणार नाही. त्या जागेवर इमारत आहे. तुम्ही सातबारा पाहा. शोधपत्रिका काढा, तुम्हाला स्पष्ट होईल. '


माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' (Madam Commissioner) या  पुस्तकांत अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला  देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


'अमृतपाल सिंह या तरुणाचा मृत्यू झाला, त्यावेळी तिथे कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. अग्नीविरांना प्रशिक्षण न देता त्यांना पाठवलं. पण त्याने आता त्याला आणि त्याच्या आईवडिलांना  काय मिळणार आहे. असे निर्णय घेऊन तुम्ही भारत उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहात', असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे.  अग्निवीर अमृतपाल सिंग यांनी  जम्मू-काश्मीरमध्ये पूँछमध्ये कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. ड्युटीवर असताना गोळी लागल्याने अग्निवीर अमृतपाल सिंग शहीद झाले. त्याचवेळी लष्कराने त्यांना सलामी न दिल्याने उत्तर प्रदेशात संतापाची लाट पसरली. विद्यमान धोरणानुसार त्याला गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत.


पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. नविन पोरांना तोंडाला गुळ लावायचा प्रकार केला जातोय. त्यामुळे अग्निवीर ही कशी फसवणूक आहे हे यावरुन स्पष्ट होतं. तसेच यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अग्नीवीर योजनेवर देखील भाष्य केलं.' 


आजही केंद्राच्या हातात परिस्थिती - जितेंद्र आव्हाड


मनोज जरांगे पाटील यांची जालनामध्ये अंतरवली सराटीमध्ये सभा पार पडली. तर या सभेवर देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, सराटीमध्ये मोठी सभा झाली. दोन समाज समोर उभे राहिले आहेत. पण आजही केंद्राच्या हातात परिस्थिती आहे. 50 टक्के आरक्षण  आहे. ते तुम्ही केंद्राला सांगा. तुम्हाला कोणालाच काही द्यायच नाहीये. तर आम्ही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केल्याचं देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मिरा बोरवणकर यांच्यावर देखील भाष्य केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मिरा बोरवणकर या कधीही वादग्रस्त ठरणार नाही. त्यामुळे त्यांचे आरोप गंभीर आहे. मी पुस्तक वाचलं नाही. पण मी कितीही मागणी केली तरी त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. त्यामुळे काहीच होणार नाही.' 


शरद पवार कोणाला कशी मदत करतात हे मला माहित आहे. भुजबळांबद्दल देखील मला आदर आहे. त्यांच्या घरावर धाड पडली तेव्हा त्यांनी म्हटलं की मला तेव्हा मदत मिळाली नाही. पण तेव्हा शरद पवारांनी फोन केला होता. याचा मी साक्षीदार आहे. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा : 


Agniveer Amritpal Singh : अग्निवीर अमृतपाल सिंगचा पूँछ जिल्ह्यात कर्तव्यावर मृत्यू; भारतीय लष्कर म्हणते, स्वत:ला इजा करून त्याचा मृत्यू! गार्ड ऑफ ऑनर, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाही