MLA Pratap Sarnaik 11 Crore Property in Custody of ED : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीनंतर संपूर्ण राज्याचं राजकारण (Maharashtra News) ढवळून निघालं. शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनी ईडीच्या (ED) भितीपोटी बंड केल्याचं बोललं जात होतं. पण अद्याप शिंदे गटातील आमदांवरची ईडीची पीडा टळलेली दिसत नाही. आता ईडी प्रताप सरनाईकांना एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीनं तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11 कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनं जप्त केलेली 11 कोटींची संपत्ती योग्य असल्याचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॅाडीने दिला आहे.


शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील भूखंडावर लवकरच ईडीमार्फत (Enforcement Directorate) जप्ती येऊ शकते. सरनाईक यांची तब्बल 11.4 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालय ताब्यात घेणार आहे. दरम्यान, एनएसईएल घोटाळा प्रकरणी (NSEL Scam) काही दिवसांपूर्वी ईडीनं या संपत्तीवर तात्पुरती जप्ती आणली होती. आता संपूर्ण तपासानंतर या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक न्यायालयात दाद मागू शकतात. 


2013 मध्ये FIR दाखल 


2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी ईडीनं चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचं निष्पन्न झालं होतं. जवळपास 13000 गुंतवणुकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.  


ईडीच्या तपासात काय निष्पन्न? 


आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं होतं. आस्था ग्रुपनं सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीनं दिली होती. कागदपत्रांची तपासणी आणि मिळालेली माहिती आदींच्या आधारे ईडीनं प्रताप सरनाईकांचे ठाणे येथील दोन फ्लॅट आणि मिरा रोड येथील जमिनीचा काही भाग जप्त केला होता. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ही 11.35 कोटी रुपये असून पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीनं सांगितलं होतं.