Mumbai Police :   महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं.  यानंतर राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांच्या कार्यलयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर  मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.  राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. शहराच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.य

  


शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सध्या शहरात  कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस अंमलदार व हवालदारांची ड्यूटी आठ  तासांवरून 12 तासांवर करण्यात आली आहे.  सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर राहणार असून रविवारी साप्ताहिक सुटी घेणार नाही. त्यांना  आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्टी दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे. 


एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची कार्यालयासमोर घोषणाबाजी आणि दगडफेक केली. संजय राऊतांनी मोठ्या विरोध प्रदर्शनाचा इशारा दिला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Ramdas Kadam : मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच : रामदास कदम


सरकार अस्थिर करण्यासाठी पैसा कुणी पुरवला? ईडी, इन्कम टॅक्स विभागानं चौकशी करावी; राष्ट्रवादीची माग


Maharashtra Political Crisis : कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे : गृहमंत्री