मुंबई : राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यात आहे. पोलीस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलीय. तर इतर विभागांना  फक्त 50  टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलीय. 


 पोलीस खात्यात (Maharashtra Police Bharti)   100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.  पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.


अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना 


पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले होके. 


सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.


मनुष्यबळाअभावी केली होती 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती


गणेशोत्सव झाला असला तरीदेखील नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. मुंबई पोलीस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई असून नवी भरती प्रक्रिया होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी विनंती केली होती. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आला होता.  त्यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली होती.


अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या


पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.   


हे ही वाचा :


Job Majha : इस्रोमध्ये भविष्य घडवण्याची तरुणांना संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, तर नवी मुंबई महानगरपालिकेतही रिक्त जागांसाठी पदभरती


Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 421 पदांसाठी बंपर भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी