मुंबई : आमदार रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं 4 मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. 


आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा हे दोघंही गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी कोणीच नाही. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर आज नोटिस चिकटवली. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त बांधकाम आणि काही नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेकडून तपासणीसाठी नोटिस पाठवण्यात आली आहे.


राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावणी आज न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा राहत असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांचे नावे नोटीस पाठवण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या :


Hanuman Chalisa Row : राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी


नवनीत राणांना स्पॉंडिलायसिस, अनिल देशमुखांना खांदेदुखी तर मलिकांना मुत्राशयाचा विकार; उपचारासाठी मागितल्या परवानग्या