Kalyan News Update : कल्याणमधील दुर्गाडी चौक येथे रमजान ईदनिमित्त रस्त्यावर नमाज पठणाचा कार्यक्रम मुस्लिम समाजातर्फे केला जातो. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी आज मध्यरात्रीपासून उद्या नमाज पठण होईपर्यंत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत नमाज पठणाच्या वेळी गोविंदवाडी बायपास वाहतकीसाठी बंद ठेवला आहे. गोविंदवाडी बायपास रस्ता ते दुर्गामाता चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व प्रकारची अवजड वाहने, बहुचाकी वाहनांना कल्याण शहरातून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
प्रवेश बंद
कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
या मार्गावरील सर्व वाहने लालचौकी येथे उजवीकडे वळण घेवून आधारवाडी चौक - वाडेघर सर्कल मार्गे इच्छितस्थळी जातील.
प्रवेश बंद
भिवंडीकडून कल्याण शहरात आग्रा रोडमार्गे, गोविंदवाडी बायपासमार्गे कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
या मार्गावरील सर्व वाहने दुर्गामाता चौक येथे डावीकडे वळण घेवून वाडेघर सर्कल- आधारवाडी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद
कल्याण (पूर्व) कोळसेवाडी बाजूकडून गोविंदवाडी बायपासमार्गे दुर्गामाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
या मार्गावरील सर्व वाहने पत्रीपूल - छत्रपती शिवाजी महाराज चौक - लाल चौकी येथे उजवे वळण घेवून आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद
कल्याण शहराअंतर्गत दुर्गाडी चौक, गोविंदवाडी बायपास, पत्रीपुलमार्गे आणि दुर्गाडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपुलमार्गे जाणाऱ्या कंटेनर, ट्रेलर इत्यादी मल्टीएक्सल / जड –अवजड वाहनांना रमजान ईदच्या दिवशी दिवसा आणि रात्रौ प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या